काँग्रेस, डाव्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे इंधन दरवाढ : माधव भांडारी    

इंधनाला जीएसटीमध्ये घेण्याच्या निर्णयाला जीएसटी कौन्सिलमध्ये काँग्रेस व डाव्यांनी विरोध केला. त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे पेट्रोल डिझेलची दरवाढ रोखणे शक्य झाले नाही, असा आरोप भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी आज (ता.27) देऊळगाव राजा येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना केला.
काँग्रेस, डाव्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे इंधन दरवाढ : माधव भांडारी    

देऊळगावराजा : इंधनाला जीएसटीमध्ये घेण्याच्या निर्णयाला जीएसटी कौन्सिलमध्ये काँग्रेस व डाव्यांनी विरोध केला. त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे पेट्रोल डिझेलची दरवाढ रोखणे शक्य झाले नाही, असा आरोप भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी आज (ता.27) देऊळगाव राजा येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना केला.
                  
महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना सनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष भाजप प्रवक्ते माधव भांडारी आज शहरातील एका धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी आले असता शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. गणेश मांटे, नगराध्यक्ष सुनीता शिंदे, दादा व्यवहारे, डॉ. रामदास शिंदे, अॅड. घनश्याम भाला, डॉ.सुनील कायंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पत्रकारांशी संवाद साधताना पुढे ते म्हणाले, की इंधनाला जीएसटीमध्ये घेतलं असतं तर पेट्रोल डिझेलचे दर 29 रुपयाने कमी झाले असते. मात्र काँग्रेस व डाव्यांनी इंधनाला जीएसटीमध्ये घेण्यासाठी आपला विरोध दर्शविला व जीएसटी कौन्सिलमध्ये एकमताने निर्णय आवश्यक असल्याने शासनाला निर्णय घेता आला नाही. परिणामी इंधन दरवाढ रोखणे शक्य झाले नाही.

प्रकल्प पुनर्वसनासंदर्भात बघताना ते म्हणाले, की बुलढाणा जिल्ह्यातून नव्याने विस्थापित गावांच्या समस्या सोडविण्यास संदर्भात एकही तक्रार नाही. विस्थापितांनी आपल्या अडचणीसंदर्भात महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणाकडे लेखी स्वरूपात तक्रार केल्यास त्यांचे प्रश्न मार्गी लावू. शासनाने नागरी पुनर्वसनासाठी पुरेसा निधी दिला असताना अनेक जिल्ह्यात तो निधी खर्चिक झाला नाही. पुनर्वसन व विस्थापितांसाठी शासन गांभीर्याने विचार करीत आहे. प्रकल्पबाधितांच्या सर्वच समस्या मार्गी लागल्या नाहीत. अनेक जिल्ह्यात पुनर्वसनासंदर्भात गंभीर परिस्थिती आहे. म्हणून शासनाने पुनर्वसनाच्या प्रक्रियेसंदर्भात मोठ्या प्रमाणात बदल स्वीकारले असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या भेटीवर बोलताना ते म्हणाले, की पन्नास वर्षापूर्वीपासून भाजप आयोध्येत राम मंदिराच्या प्रश्नावर लढा देत आहे. त्यावेळी काँग्रेसपासून सर्वच केंद्रीय व प्रादेशिक पक्षांनी आपले मत स्पष्ट केले नव्हते. आता सर्वांनाच राम मंदिर व भगवान श्रीरामाचे दर्शन घेण्याची आठवण येत आहे. 

आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेना युती संदर्भात विचारले असता, पक्षाची भूमिका युती संदर्भात सकारात्मक आहे. पुढील निर्णय मित्र पक्षावर अवलंबून आहे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ टाकळकर, नगरसेविका शारदाताई जायभाय, विमल माळोदे, महिला शहराध्यक्ष सुनिता पाटील, बाजार समितीचे उपसभापती भगवान नागरे, भगवान मुंडे, प्रल्हाद गीते, सुधाकर जायभाय, संजय मुंडे, शहराध्यक्ष प्रवीण धन्नावत, युवा तालुका अध्यक्ष रामेश्वर डोईफोडे, नगरसेवक निशिकांत भावसार,विकास डोईफोडे,सुजित गुंडे, संचित धनावत, श्रीराम बर्डे आदींची उपस्थिती होती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com