गुलाबराव गावंडेंसमोर मुलाखतीस विजय देशमुखांचा नकार : जशास तसे उत्तर!

गुलाबराव गावंडेंसमोर मुलाखतीस विजय देशमुखांचा नकार : जशास तसे उत्तर!

अकोला ः अकोला जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात निरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली झाल्या.

इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करीत पक्ष निरीक्षकांपुढे मुलाखती दिल्यात. दरम्यान, माजी जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांनी जिल्हा कार्यालयात जावून मुलाखत देण्यास नकार दिला. अखेर पक्ष निरीक्षकांना त्यांनी माजी उपमहापौरांच्या कार्यालयात बोलावून त्यांची बाजू मांडली व निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली.

मुख्य निरीक्षक माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री वसुधाताई देशमुख, माजी मंत्री गुलाबराव गावंडे व जिल्हा निरीक्षक प्रवीण कुंटे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखत समितीमध्ये माजी आमदार तुकाराम बिडकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. विश्‍वनाथ कांबळे, प्रवक्त्या डॉ.आशाताई मिरगे, जिल्हा अध्यक्ष संग्राम गावंडे, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे, माजी जि.प. सभापती पुंडलीकराव अरबट, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सय्यद युसूफ अली, प्रा.विजय उजवणे यांच्यासह शहर अध्यक्ष राजू मूलचंदानी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी बाळापूर विधानसभा तर राजू मुलचंदानी, सय्यद युसुफली, प्रा.उजवणे यांनी अकोला पश्चिममसाठी मुलाखती दिल्यात. जिल्ह्यातील ३० च्या वर इच्छुक उमेदवारांसह शेकडो समर्थकांनी जिल्हा कार्यालयात दिवसभर गर्दी केली.

अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध रीतीने उपस्थित सर्व उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण करण्यात आल्या. सर्व इच्छुक उमेदवारांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मागून आपले शक्तिप्रदर्शन करीत कार्यहवाल सादर केला. सर्वांना शुभेच्छा देत आजच्या घेतलेल्या मुलाखतींचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे लवकरच पाठवला जाईल, असे प्रतिपादन मुख्य निरीक्षक व समितीने केले. जिल्ह्यातील पुढील कार्यक्रम लवकरच सर्वांना जाहीर केला जाईल, असे जिल्हा महासचिव डॉ.विजयकुमार वाघ यांनी सांगितले.

मुलाखत टाळून माजी जिल्हाध्यक्षांनी घेतली निरीक्षकांची भेट

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी विधानसभा निवडणुकीच्या मुलाखतीदरम्यानही उघडकीस आली. माजी जिल्हाध्यक्ष विजय देशमुख आणि माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यातील मतभेद जगजाहीर आहेत. त्यामुळे देशमुख यांनी बुधवारी गावंडे यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यालयात जावून मुलाखत देण्याचे टाळले. मुलाखती आटोपल्यानंतर तिन्ही पक्ष निरीक्षकांना त्यांनी माजी उपमहापाैर रफिक सिद्धीकी यांच्या कार्यायलायात  बोलावून त्यांची भेट घेतली व आपण अकोला पश्‍चित विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे त्यांना सांगितले. यावेळी दोन पक्ष निरीक्षक वसुधाताई देशमुख आणि प्रवीण कुंटे पाटील यांनी देशमुख यांना जिल्हा कार्यालयातच का मुलाखत दिली नाही म्हणून विचारणा करीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

जशास तसे!

विजय देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असताना माजी राज्य मंत्री व तत्कालीन प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी त्यांच्या कार्यालयात जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता मीही त्यांच्या कार्यालयात जावून मुलाखत देणार नाही, असा आग्रह विजय देशमुख यांनी धरला व जिल्हा कार्यालयात मुलाखतीला जाण्यास टाळत जशास तसे उत्तर दिल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखती घेतल्यात. सहा तास मुलाखतीचा कार्यक्रम चालला. प्रत्येकाची बाजू समजून घेतली. काही वरिष्ठ नेत्यांच्या मुलाखती घेण्याचा प्रश्‍नच नव्हता. त्यात गुलाबराव गावंडे, विजय देशमुख यांच्यासारख्या नेत्यांच्या समावेश आहे.

मुलाखती देणारे विधानसभा मतदारसंघ निहाय इच्छुक
अकोट विधानसभा 
१) सौ पद्माताई अहेरकर
२) राजू बोचे 
३) कैलास गोंडचवर

बाळापूर विधानसभा 
१) श्री.संग्राम गुलाबराव गावंडे
२) श्री.शिवाजी म्हैसने
३) श्री.हिदायात खा रूम खा

अकोला पश्चिम विधानसभा :
१) सौ.रिझवाना शेख अजीज
२) श्री.राजकुमार मूलचंदानी
३) श्री.सय्यद युसूफ अली
४) श्री.सरफराज खान
५) श्री.जावेद झकेरीया
६) श्री.विजय उजवणे
७) श्री.विकास गायकवाड
८) श्री.बाबासाहेब घुमरे
९) श्री.मो.सालार खा मो.
      
अकोला पूर्व विधानसभा  
१) सौ.छायाताई देशमुख
 
मूर्तिजापूर विधानसभा
१) श्री.श्रावण रनबावळे
२) श्री.भाऊराव सुरडकर
३) श्री.कोमल तायडे
४) श्री.दयाराम घोडे
५) श्री.लखन मिलांदे
६) श्री.धनराज खिराडे
७) श्री बलदेव पळसपगार
८) श्री.प्रकाश खाडे
९) श्री.रविकुमार राठी
१०) श्री.अशोकराव कांबळे
११) श्री.प्रवीण भोटकर
१२) श्री.तुषार दाभाडे
१३) श्री.नारायण धनगाव
१४) श्री.सुधाकर डोंगरे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com