आमदार देशमुख बंधू आणि शिंदे बंधू चर्चेत! 

नव्याने अस्तित्वात आलेल्या विधानसभेत लातूरचे आमदार देशमुख बंधू आणि माढ्याचे आमदारशिंदे बंधू चर्चेत आले आहे. सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर हे बंधू चर्चेचा विषय झाले.
आमदार देशमुख बंधू आणि शिंदे बंधू चर्चेत! 

पुणे - नव्याने अस्तित्वात आलेल्या विधानसभेत लातूरचे आमदार देशमुख बंधू आणि माढ्याचे आमदार शिंदे बंधू चर्चेत आले आहे. सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर हे बंधू चर्चेचा विषय झाले. 

गेला महिनाभर अस्थिर राजकारणातून जात असताना याकडे फारसे लक्ष गेले नाही. परंतु कॉंग्रेसचे आमदार अमित देशमुख व त्यांचे छोटे बंधू आमदार धीरज देशमुख; तसेच राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे व त्यांचे बंधू अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर या बंधूंच्या जोड्या चर्चेत आल्या. 

माजी मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख हे तिसऱ्यांदा लातूर शहरातून विधानसभेवर निवडून आले आहेत. कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव असलेल्या अमित देशमुख यांनी युवा कॉंग्रेसची जबाबदारी सांभाळली होती. लातूर नगर परिषदेच्या 1997 मध्ये झालेल्या निवडणुकीपासून त्यांनी सक्रीय राजकारणात पदार्पण केले. विलासराव देशमुख यांचे दुसरे पुत्र धीरज देशमुख यांनी विधानसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच नशिब अजमावले. त्यासाठी त्यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघाची निवड केली. या दोन्ही मतदारसंघांमध्ये दोघांनाही यश मिळाले. त्यामुळे देशमुख घराण्यातील हे सख्खे बंधू निकाल लागल्यानंतर चर्चेचा विषय ठरले होते. दोघांनीही काल शपथ घेतल्यानंतर पुन्हा दोघेही चर्चेत आले होते.

चर्चेतील दुसरे बंधू म्हणजे माढ्याचे शिंदे बंधू. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे माढ्यातून विधानसभेत पोचले आहेत, तर त्यांचे बंधू संजयमामा शिंदे करमाळ्यातून अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. बबनदादा सहाव्यांदा निवडून आले आहेत. त्यांचे बंधू संजयमामा यांनी 2014 मध्येही विधानसभा निवडून करमाळ्यातून लढवली होती. मात्र त्यात ते पराभूत झाले होते. दरम्यान ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी नशीब अजमावून पाहिले. मात्र त्यात त्यांना यश मिळू शकले नाही. आता करमाळ्यातून विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली आणि जिंकलीही. या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही पाठिंबा दिला होता. त्यामुळे या बंधूंची जोडी चर्चेत आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com