देशातील पुरोगामी राजकारणाची पीछेहाट तात्पुरती : गणपतराव देशमुख

माजी आमदार संपतराव पवार-पाटील म्हणाले, ""अनेक कार्यकर्त्यांनी स्वार्थासाठी पक्ष बदलला, पण आम्ही वादळात दिवा लावून पक्ष टिकवून ठेवला आहे. पक्षीय विचारापासून कधीही बाजूला गेलो नाही. यावेळी शिक्षक आमदार बाळाराम पाटील, भोगावती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार-पाटील, केरबा भाऊ पाटील, महादेवराव कोथळकर, नामदेवराव पाटील, मार्केट कमिटी संचालक अमित कांबळे, भारत पाटील, एकनाथ पाटील, विश्वास वरुटे, सरदार पाटील, तुकाराम ख्रराडे, बाबूराव कदम, शामराव मुळीक आदी उपस्थित होते. प्रा. पवन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. बाबासाहेब देवकर यांनी आभार मानले.
 सडोली खालसा : शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा गणपतराव देशमुख यांनी सत्कार केला. शेजारी आमदार जयंत पाटील, संपतराव पवार-पाटील, आमदार बाळाराम पाटील, अशोकराव पवार-पाटील, बाबासाहेब देवकर आदी.
सडोली खालसा : शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा गणपतराव देशमुख यांनी सत्कार केला. शेजारी आमदार जयंत पाटील, संपतराव पवार-पाटील, आमदार बाळाराम पाटील, अशोकराव पवार-पाटील, बाबासाहेब देवकर आदी.

सोनाळी : देशातील शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित शेती मालाला दर मिळाला नाही, तर देशाचा विकास होणार नाही, आज राज्यात बेरोजगारी वाढत आहे, कष्टकऱ्यांना सुखाचे दिवस यावेत, म्हणून संघर्ष करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार प्रेरणादायी आहे. शेतकरी कामगार पक्ष हा विचारांचा ताकदीवर उभा राहिलेला पक्ष आहे, पुरोगामी राजकारणाची पीछेहाट ही तात्पुरत्या स्वरुपाच्या आहे, "शेकाप'चे तत्त्वज्ञान परिवर्तन घडवून कष्टकऱ्यांना विजयी करेल असे प्रतिपादन माजी मंत्री व "शेकाप'चे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी केले. 

सडोली खालसा (ता. करवीर) येथे शेतकरी कामगार पक्ष आणि दिनकरराव व शामराव पवार-पाटील बंधू शैक्षणिक कला, क्रीडा, सांस्कृतिक संस्थेतर्फे झालेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार आणि गुणवंतांचा गौरव अशा कार्यक्रमात श्री. देशमुख बोलत होते. "शेकाप'चे प्रदेश सरचिटणीस आमदार जयंत पाटील म्हणाले, ""पश्‍चिम महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या अर्थकारणाने अन्य उद्योगधद्यांचा हातभार लावला आहे, पण साखर कारखानदारीला भ्रष्टाचाराची कीड लागल्याने साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यामुळे साखर कारखानदारांनी आधुनिकरण करून काटकसर करून ऊस उत्पादकांना जादा दर द्यावा.'' 

माजी आमदार संपतराव पवार-पाटील म्हणाले, ""अनेक कार्यकर्त्यांनी स्वार्थासाठी पक्ष बदलला, पण आम्ही वादळात दिवा लावून पक्ष टिकवून ठेवला आहे. पक्षीय विचारापासून कधीही बाजूला गेलो नाही. यावेळी शिक्षक आमदार बाळाराम पाटील, भोगावती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार-पाटील, केरबा भाऊ पाटील, महादेवराव कोथळकर, नामदेवराव पाटील, मार्केट कमिटी संचालक अमित कांबळे, भारत पाटील, एकनाथ पाटील, विश्वास वरुटे, सरदार पाटील, तुकाराम ख्रराडे, बाबूराव कदम, शामराव मुळीक आदी उपस्थित होते. प्रा. पवन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. बाबासाहेब देवकर यांनी आभार मानले. 

342 कार्यकर्त्यांचा सत्कार 
कार्यक्रमात 101 वर्ष पूर्ण केलेले ज्येष्ठ कार्यकर्त विष्णू पाटील (देवाळे) बाबूराव पाटील, तुकाराम पाटील, यांच्यासह शेकापच्या 342 ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह पंचगंगा कारखान्याचे संचालक प्रतापराव माने-पाटील, नूतन न्यायाधीश पल्लवी पाटील, मेधा माळी, प्राजक्ता जरग, रूपाली पाटील, पोलिस उपनिरीक्षक तुषार सारंग, दीपक मेटील यांचा सत्कार करण्यात आला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com