विनोद तावडे यांच्यानंतर "एमएसडी'च्या स्थापनेची घोषणा देशमुखांकडूनही !

लातूर हे सांस्कृतिक केंद्र बनेलविलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना राज्य बाल नाट्य स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. या स्पर्धेची अंतिम फेरी लातूरात होत आहे, याचा आनंद आहे, असे सांगून देशमुख म्हणाले, या स्पर्धा राज्यातील दहा केंद्रावर घेतल्या जातील. पुढील वर्षापासून ही स्पर्धा 15 केंद्रावर घेतली जाईल. त्यात लातूरचा समावेश असेल. राज्य नाट्य स्पर्धेच्या समन्वयक व सहसमन्वयकाचे मानधनात वाढविण्याचा सकारात्मक विचार केला जाईल. अशा वेगवेगळ्या धोरणांतून लातूर शहर हे येत्या काळात सांस्कृतिक केंद्र म्हणून नावारुपाला यावे, असा आमचा प्रयत्न आहे.
विनोद तावडे यांच्यानंतर "एमएसडी'च्या स्थापनेची घोषणा देशमुखांकडूनही !

लातूर : दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या (एनएसडी) धर्तीवर राज्यात " महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा ' (एमएसडी) सुरू केली जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी येथे केली. मात्र, तत्कालिन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनीही काही वर्षांपूर्वी "एमएसडी'ची घोषणा केली होती. त्यासंदर्भात समितीही नेमली. पण, घोषणा प्रत्यक्षात उतरली नाही. आतातरी "एमएसडी' महाराष्ट्रात प्रत्यक्षात उतरेल का, याकडे नाट्यवर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित 17 व्या महाराष्ट्र राज्य बाल नाट्य स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यात देशमुख बोलत होते. स्पर्धेच्या उद्‌घाटनाचा मान देशमुख यांनी बालकलाकार स्वयंम शिंदे आणि सिद्धी देशमुख यांना यावेळी दिला. महापौर विक्रांत गोजमगुंडे, परीक्षक अरूंधती भालेराव, वीणा लोकूर, शंकर घोरपडे, प्रकाश पारखी, एकनाथ आव्हाड, विक्रम हिप्परकर, नाट्य परिषदेचे शैलेश गोजमगुंडे, प्रदीप पाटील खंडापूरकर, मनोज पाटील, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभिषण चौरे याप्रसंगी उपस्थित होते. ज्येष्ठ रंगकर्मी गिरीश सहदेव आणि सुनीता कुलकर्णी यांचा विशेष सत्कारही करण्यात आला. 

देशमुख म्हणाले, महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा हा सरकारचा अत्यंत महत्वकांशी प्रकल्प आहे. यासाठी आम्हाला नाट्य जाणकारांच्या सुचनांची आवश्‍यकता लागणार आहे. या संस्थेत देशभरातील आणि जगभरातील नामवंत कलावंत सहभागी होऊन ते आपल्याकडील बाल कलाकारांना, नव्या पिढीतील नाट्य प्रेमींना शिक्षण देतील. त्यांना घडवतील. शेवटी कलाक्षेत्र हा एक उद्योग बनला आहे. यादृष्टीनेही याकडे पाहिले पाहीजे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल या क्षेत्रात होत आहे. कलेचे प्रदर्शन करता येतेच. त्यातून हौस भागवता येतेच. शिवाय, उपजिविकाही भागवता येते. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या, तालूक्‍याच्या पातळीवर सांस्कृतिक संचालनालय पोहचेल. तिथल्या कलाकारांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, ही आमची प्राथमिकता आहे. 

प्रत्येक बालकलाकाराला प्रमाणपत्र 
राज्यातील कानाकोपऱ्यातून बालकलाकार या स्पर्धेत सहभागी होतात. यात यश मिळवलेल्यांना मुंबई-पुणे-कोल्हापूर येथील नाट्यनिर्माते-दिग्दर्शक यांच्याकडे शिफारस करायला हवी. यासाठी संचालनालय पुढाकार घेईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक बाल कलाकाराला राज्य सरकारचे प्रमाणपत्र याआधी मिळत नव्हते. केवळ संघाला दिले जात होते. पण यापुढे प्रत्येक बालकलाकाराला ते दिले जाईल. याशिवाय, मुंबई-कोल्हापूर येथील फिल्मसिटीत बालकलाकारांना आणखी प्रशिक्षण घेण्यासाठी, अभिनयाबरोबरच नेपथ्य, रंगमंचीय व्यवस्था याबाबत शिक्षण घेण्यासाठी नवे दालन सुरू करता येईल. याचाही आम्ही विचार करू, असे देशमुख यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com