'छोटा पाकिस्तान' व्हिडिओ व्हायरल; मुख्यमंत्री बोम्मईंनी दिला कारवाईचा इशारा...

व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती म्हणते की, "कलवांडे बोले तो छोटा पाकिस्तान, ठीक हैं"
Basavaraj Bommai
Basavaraj Bommaisarkarnama

बंगळूर : म्हैसूर जिल्ह्यातील नंजनगुड तालुक्यातील कवलांडेचे कथितपणे वर्णन करणारा 'छोटा पाकिस्तान' (Pakistan) व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी गुरुवारी (ता.5 मे) तेथील पोलीस अधिक्षकांना या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याचे सांगितले.

Basavaraj Bommai
संजय राऊतांची खोचक टीका : भाड्याच्या माणसावर भगवी शाल टाकण्याचा भाजपचा उद्योग

मंगळवारी झालेल्या ईद-उल-फित्रच्या दिवशी चित्रित करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये मुस्लिम पुरुषांचा एक मोठा गट, नमाज अदा केल्यानंतर कदाचित परत जाताना किंवा रस्त्याच्या कडेला उभा असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यांना "नारा ए तकबीर अल्लाहू अकबर" असे ओरडताना ऐकू येते, त्यानंतर पोलिस आणि काही लोक जमावाला पांगवण्यास सांगताना दिसतात.

यानंतर, व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती "आमच्या गावातील मेळावा बघा" असे म्हणताना ऐकू येऊ शकते, ज्यामध्ये त्याच्यासोबतची दुसरी व्यक्ती "ये बी पाकिस्तान हैं, छोटा" (हा मिनी पाकिस्तान आहे) म्हणताना ऐकू येते आहे. त्यानंतर, व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती म्हणते की, "कलवांडे बोले तो छोटा पाकिस्तान, ठीक हैं" (कवलांडे म्हणजे मिनी पाकिस्तान). या घटनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोम्मई यांनी पत्रकारांना सांगितले की, मी पोलिस अधिक्षकांशी बोलेन आणि यावर कारवाई करण्यास सांगणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Basavaraj Bommai
शरद पवार, प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी

दरम्यान, हा व्हिडिओ शेअर करताना, युवाब्रिगेड आणि नमो ब्रिगेडशी संबंधित असलेले स्तंभलेखक आणि वक्ते चक्रवर्ती सुलिबेले यांनी बुधवारी एका ट्विटमध्ये म्हटले की, मुस्लिमांनी काल म्हैसूरच्या कौलांडे (कवलांडे) गावात मिरवणूक काढली. जरा ऐका 'भाईजान' ज्याने व्हिडीओ शूट केला तो म्हणतो, हा मिनी पाकिस्तान आहे!! ज्वालामुखीचा उद्रेक होतोय?", अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com