ट्रॅक्टर जाळणे पडले महागात; युवक काँग्रेसच्या अध्यक्षाला अटक

देशभरात कृषी कायद्यांवरुन रान पेटले आहे. या कायद्यांवरुन शेतकरी रस्त्यावर उतरले असून, सरकार आणि विरोधक आमनेसामने आले आहेत.
youth congress chief arrested in connection with burning of tractor at india gate
youth congress chief arrested in connection with burning of tractor at india gate

नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यांना मोठा विरोध होत आहे. या विरोधात देशभरात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले असताना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कायद्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. या मुद्द्यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. कृषी कायद्यांना विरोध करीत ट्रॅक्टर जाळल्याप्रकरणी पोलिसांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षाला अटक केली आहे. 

नव्या कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी देशभरात शेतकरी रस्त्यावर उतरले असून, आंदोलनाचा आगडोंब उसळला आहे. पंजाब, हरियाना, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार, तमिळनाडू आणि राजस्थानमध्ये शेतकरी या कायद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. कृषी कायद्यांवरुन विरोधकही आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षांनीही जोरदार आंदोलन सुरू केले आहे. 

पंजाब आणि हरियानामध्ये हे आंदोलन पेटले आहे. पंजाबमध्ये काही ठिकाणी शेतकऱ्यांनी लोहमार्गांवरच ठिय्या धरला असून, रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. काँग्रेसने कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. देशभरात काँग्रेस कार्यकर्ते या कायद्याच्या विरोधात निदर्शने करीत आहेत. पंजाब आणि हरियानामध्ये शेतकरी संघटना या कायद्यांच्या विरोधात मैदानात उतरल्या आहेत. 

कृषि उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन व सुविधा) विधेयक 2020, शेतकऱ्यांना मूल्य आश्वासन (सुरक्षा) करार  व कृषि सेवा विधेयक 2020 आणि जीवनावश्यक वस्तू  कायदा 2020  ही विधेयके लोकसभेत मंजूर झाली होती. त्यावर राज्यसभेचीही मोहोर उमटली आहे. देशभरात कृषी विधयेकांवरुन वातावरण तापले आहे. ही बहुचर्चित कृषी विधेयके राज्यसभेत विरोधकांनी घातलेल्या अभूतपूर्व गोंधळातच आवाजी मतदानाने मंजूर झाली होती.

या विधेयकांवरुन सरकार विरुद्ध विरोधक असा वाद पेटला आहे. याचबरोबर घटक पक्षांची नाराजीही समोर आली आहे. या विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केल्याने त्यांच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.  कृषी कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आला आहे. 

पंजाब युवक काँग्रेसच्या वतीने दिल्लीतील इंडिया गेटवर काल आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली होती. या वेळी काही कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर पेटवून दिला होता. आंदोलन करणारे कार्यकर्तेच हा ट्रॅक्टर आंदोलनस्थळी घेऊन आले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग नियंत्रण कायद्यांगतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आधी सहा जणांना अटक केली होती. आज पंजाब युवक काँग्रेसचे अध्यक्ष ब्रिंदर धिल्लन यांना अटक करण्यात आली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com