म्युकरमायकोसिस टाळायचाय? या पाच गोष्टींची घ्या काळजी...

देशातील कोरोनाचा कहर वाढला असून, आता ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकरमायकोसिस हा जीवघेणा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे.
you can avoid mucormycosis risk after following some precautions
you can avoid mucormycosis risk after following some precautions

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा (Covid19) कहर वाढत असून, यात आता नवीन आजाराची भर पडली आहे. काळी बुरशी (Black Fungus) म्हणजेच म्युकरमायकोसिस (Mucormycosis) हा जीवघेणा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे. देशात सुमारे 11 हजाराहून अधिक रुग्ण या आजाराचे आहेत. आता तज्ञांनी हा आजार टाळण्यासाठी पाच उपाय सांगितले आहेत. 

म्युकरमायकोसिस टाळण्यासाठी खालील 5 गोष्टींची घ्या काळजी : 

1) साखरेवर नियंत्रण : तुम्ही कोरोनातून बरे झाला असलात तरी रक्तातील अनियंत्रित साखर ही म्युकरमायकोसिसला निमंत्रण देणारी ठरते. त्यामुळे साखर नियंत्रणात ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. 

2) स्टेरॉईड्सचा कमी वापर : अनेक डॉक्टरांना स्टेरॉईड्सचा अतिवापर म्युकरमायकोसिससाठी कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले आहे. कोरोनाबाधितांवर उपचारासाठी स्टेरॉईड्सचा अतिवापर होत असल्याचा मुद्दाही उपस्थित झाला होता. त्यामुळे उपचारात स्टेरॉईड्सचा कमीत कमी वापर करावा. 

3) ऑक्सिजन पुरवठ्यासाठी ह्युमिडीफायरमध्ये स्वच्छ पाणी : ऑक्सिजन सिलिंडर, त्याची पाईप आदी गोष्टी निर्जंतुक केलेल्या नसणे हेसुद्धा म्युकरमायकोसिसचे कारण ठरत आहे. याचबरोबर ऑक्सिजन पुरवठ्यासाठी असलेल्या ह्युमिडीफायरमध्ये अस्वच्छ पाणी वापरल्याने म्युकरमायकोसिसचा संसर्ग होत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे पाणी स्वच्छ असेल याची काळजी घ्या. 

4) आजूबाजूला स्वच्छता : म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार आहे. त्यामुळे रुग्णाच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. 

5) तोंडातील अल्सरवर उपचार : तोंडात अल्सर आल्यास तातडीने उपचार घ्यावेत. कारण हे म्युकरमायकोसिसचेही लक्षण असू शकते. जेवढ्या लवकर निदान तेवढ्या लवकर उपचार होऊन तुम्ही बरे होऊ शकता. 

म्युकरमायकोसिसचे रुग्ण वेगाने वाढू लागल्याने केंद्र सरकारने सर्व राज्यांना हा साथीचा रोग जाहीर करण्याची सूचना केली होती. तसेच, या आजाराच्या रुग्णांचा आकडे केंद्राकडे सादर करण्यास सांगितले आहे. कोरोना संकटामुळे आधीच कोलमडून पडलेल्या आरोग्य व्यवस्थेसमोर आता म्युकरमायकोसिसचे आव्हान निर्माण झाले आहे. जगात इतर देशांच्या तुलनेत भारतात म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. 

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना साधारणपणे काही आठवडे ते महिन्यांत हा आजार होत आहे. सुरवातीला हा आजार सायनस, नाक, दात येथे दिसून येतो. नंतर तो डोळे आणि मेंदूपर्यंत पोचतो. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना या आजाराचा धोका अधिक असतो. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com