Gautam Seth, Yoginder Dhingra
Gautam Seth, Yoginder Dhingra

पंजाबमध्ये राजीनाम्याचं वारं; आणखी दोन नेत्यांनी सोडलं पद, दिवसभरात पाचवा धक्का

सिध्दू यांच्या राजीनाम्यानंतर प्रदेश सरचिटणीस योगिंदर धिंग्रा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

नवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाला मोठा धक्का बसला. पण त्यानंतर हे राजीनामा सत्र अद्याप थांबलेलं नाही. दिवसभरात सिध्दू यांच्यासह आतापर्यंत पाच नेत्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामध्ये एका कॅबिनेट मंत्र्यांचाही समावेश आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेसमधील संकट अधिकच गडद होत चालल्याचे चित्र आहे.

सिध्दू यांच्या राजीनाम्यानंतर प्रदेश सरचिटणीस योगिंदर धिंग्रा व सरचिटणीस गौतम सेठ यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्याआधी कॅबिनेट मंत्री रजिया सुलताना व खजिनदार गुलजार इंदर चहल यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. सिध्दू यांच्या समर्थनार्थ या नेत्यांनी राजीनामे दिल्यानं काँग्रेसची डोकेदुखी वाढत चालली आहे. सिध्दू यांना पाठिंबा देण्यासाठी आणखी काही नेते राजीनामे देऊ शकतात, अशी चर्चा आहे.

Gautam Seth, Yoginder Dhingra
सिध्दूंचा राजीनामा अन् राहुल गांधी पत्रकार परिषदेत पोहचलेच नाहीत!

रजिया सुलताना यांनी दोनच दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. सिद्घू यांनी राजीनामा देताच त्यांनीही राजीनामा दिला आहे. त्यांनी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. सुलताना यांचे पती व माजी आयपीएस अधिकारी मोहम्मद मुस्तफा हे सिद्धूंचे सल्लागार आहेत. सुलताना यांनी म्हटले आहे की, सिद्धू यांनी राजीनामा दिल्याने मीसुद्धा राजीनामा देत आहे. यापुढेही मी पक्षासाठी कार्य करीत राहीन. पंजाबच्या हितासाठी मी काम करेन. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे मी आभार मानते.

सिद्धू यांनी राजीनामा देताच तासाभरात काँग्रेसचे खजिनदार गुलजार इंदर चहल यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे चहल यांची सातच दिवसांपूर्वी खजिनदारपदी निवड करण्यात आली होती. चहल हे लोकप्रिय पंजाबी अभिनेते व निर्माते आहेत. दरम्यान, काँग्रेस नेतृत्वाने याची दखल घेऊन पक्षाचे प्रभारी आणि निरीक्षकांना तातडीने पंजाब काँग्रेसच्या स्थितीचा आढावा घेण्याचा निर्देश दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सिद्धू यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दोन ओळीचा राजीनामा पाठवला आहे. तडजोड केल्यानंतर माणसाच्या व्यक्तिमत्वाचा ऱ्हास सुरू होते. मी पंजाबचे भविष्य आणि कल्याण यासोबत तडजोड करणार नाही. यामुळे पंजाब काँग्रेस प्रदेश समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. मी काँग्रेस सेवा करीत राहीन, असे सिद्धू यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे. यामुळे ते काँग्रेस सोडणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com