अखेर ठरलं..योगी मथुरेतून नव्हे तर अयोध्येतून!

उत्तर प्रदेशात किमान ३०० जागा आणण्याच्या दृष्टीने भाजप रणनीती आखत आहे.
 Yogi Adityanath
Yogi Adityanathsarkarnama

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) अखेर अयोध्येतून विधानसभा निवडणूक (Assembly elections) लढविण्याची दाट शक्यता आहे. आधी त्यांनी मथुरेतून निवडणूक लढवावी असा आग्रह होता. मात्र, आता स्वतः आदित्यनाथ यांनीच अयोध्येकडे आपला कल असल्याचे दिल्लीतील बैठकीत स्पष्ट केल्याचे समजते.

दरम्यान, उत्तर प्रदेशात भाजप (BJP) सोडल्यावर उपमुख्यमंत्री स्वामीप्रसाद मौर्य यांच्यावर दुसऱ्याच दिवशी धरपकडीची टांगती तलवार आहे. त्यातच त्यांच्या पाठोपाठ योगी सरकारमधील दुसरे मंत्री दारासिंह चौहान यांनी दलित व मागासवर्गीयांची उपेक्षा केल्याचा आरोप करून भाजपला दिलेली सोडचिठ्ठी या दोन धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी आजही निवडणूक व उमेदवारीबाबत दीर्घ मंथन केले. या बैठकीत स्वामी प्रसाद व दारासिंह यांच्या राजीनाम्याबाबत फारशी चर्चा झाली नाही, असे सूत्रांनी सांगितले. केंद्रीय निवडणूक समितीच्या उद्या (ता. १३) होणाऱ्या बैठकीआधी पहिल्या-दुसऱ्या फेरीतील भाजपच्या उमेदवारी याद्या अंतिम करण्यावर गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) व योगी आदित्यनाथ यांचा भर आहे.

 Yogi Adityanath
भाजप सोडताच बड्या नेत्याला मोठा झटका! 24 तासांतच निघालं अटक वॉरंट

उत्तर प्रदेशात किमान ३०० जागा आणण्याच्या दृष्टीने भाजप रणनीती आखत आहे. स्वामीप्रसाद मौर्य यांच्या आधी निवडणूक हरलेल्या मुलाला व निवडूनही येऊ न शकणाऱ्या काही समर्थकांना तिकीट देण्यास योगींनी नकार केला ते त्यांच्या भाजप त्यागाचे तत्कालिक कारण बनल्याचे सांगितले जात आहे. आता मौर्य यांनी १४ तारखेला भाजपवर संक्रांत येणार व अनेक मंत्री-आमदार पक्ष सोडणार अशी भविष्यवाणी केली. या पार्श्वभूमीवर टीम योगीतील आणखी किती पक्षनेते व मंत्री आपल्या मुलांसाठी तिकीटे मागत आहेत याची सविस्तर माहिती शहा यांनी आजच्या बैठकीत घेतल्याचे समजते. भाजपच्या विद्यमान किमान ७५ आमदारांवर टांगती तलवार असल्याचे वृत्तही यापूर्वी दिले होते.

विधानसभेची निवडणूक लढविणारे योगी यांचीही इच्छा अयोध्येतून निवडणूक लढविण्याची असल्याचे सांगितले जाते. अयोध्येतील हनुमान गढी व रामजन्मभूमी त्यांच्यासाठी बालपणा पासून श्रद्धधेचे स्थान असल्याचे पक्षनेते सांगतात. त्यामुळे योगी अयोध्याच निवडतील असे सांगितले जात आहे. तसे झाले तर मथुरेचे आमदार व राज्याचे उर्जामंत्री श्रीकांत शर्मा मोठा निश्वास सोडतील हे उघड आहे. योगी यांनी मथुरेतून लढावे यासाठी राज्यसभा खासदार हरनाथ यादव यांनी भाजप नेतृत्वाला पत्र लिहीले आहे. तथापि योगी यांनी अयोध्येतून लढल्यास हिंदुत्वासाठी मोठा संदेश जाईल असे मानणारा मोठा वर्ग आहे.

 Yogi Adityanath
'सपा'ला जमलं नाही ते राष्ट्रवादी करून दाखवणार? थेट भाजपशी टक्कर

केवळ राजकीय सोय पाहून भाजप आप आपले मूळ सिद्धांतांशी कधीही तडजोड करत नाही. हा मेसेज जगभरात जाईल असे मानणारे अनेक नेते भाजपमध्ये आहेत. त्यातील उत्तर प्रदेशाचे राजकारण खडा न खडा माहिती असलेल्या एका ज्येष्ठ नेत्यांनी तर हीच भावना आपल्या वाढदिवशी (५ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याकडेही व्यक्त केल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com