योगींची दुसरी इनिंग सुरू; उपमुख्यमंत्र्यांमध्ये एक पराभूत नेता अन् दुसरा नवीन चेहरा

Yogi Adityanath Oth Ceremony मध्ये यूपीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वी, ते 1998 ते 2017 पर्यंत सलग पाच वेळा गोरखपूरचे खासदार होते.
योगींची दुसरी इनिंग सुरू; उपमुख्यमंत्र्यांमध्ये एक पराभूत नेता अन् दुसरा नवीन चेहरा
Yogi Adityanath Oth CeremonyTwittwe/@ANI

लखनौ : भारतीय जनता पक्षाचे नेते योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी आज (२५ मार्च) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. पन्नास हजारहून अधिक जणांच्या उपस्थितीत अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियममध्ये राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी योगींना शपथ दिली. तर केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनीही शपथ घेतली. दोघेही उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

लखनौच्या इकना स्टेडियममध्ये झालेल्या या भव्य सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) , संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah) आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानंतर राष्ट्रगीताने शपथविधी कार्यक्रमाची सुरुवात झाली. योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी (२४ मार्च) राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेत राज्यात सत्तास्थापनेचा दावा केला.

Yogi Adityanath Oth Ceremony
भाजप खासदार संसदेतच रडल्या अन् आपल्याच राज्यात केली राष्ट्रपती राजवटीची मागणी!

संन्यासी असलेल्या योगी आदित्यनाथांनी आपला मुख्यमंत्री पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण केल्यानंतर आज (25 मार्च) सलग दुसऱ्यांनी सर्वाधिक लोकसंख्येच्या राज्याची सूत्रे हाती घेतली. तब्बल तीन दशकांनंतर राज्यात एकाच पक्षाचे सरकार स्थापन झाले. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निवडणूक प्रचारादरम्यान, पंतप्रधानांनी योगी आदित्यनाथ यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांनी दिलेला नारा "यूपी अधिक योगी बहुत है उपयोगी"हा खूप लोकप्रिय झाला.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत, भाजपने निवडणूक जिंकल्यानंतर आदित्यनाथ यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली. राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर, त्यांनी गृह, वित्तविभाग, सैनिक कल्याण, होमगार्ड, नागरी संरक्षण यासह एकूण 36 विभाग आपल्या थेट नियंत्रणाखाली ठेवले होते. 2017 मध्ये यूपीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वी, ते 1998 ते 2017 पर्यंत सलग पाच वेळा गोरखपूरचे खासदार होते.

5 जून 1972 रोजी उत्तराखंडमधील एका गावात त्यांचा जन्म झाला.त्यांच्या पालकांनी त्यांचे नाव अजय सिंग बिश्त असे ठेवले होते. मात्र राम मंदिराच्या उभारणीच्या चळवळीत सामील होण्यासाठी त्यांनी घर सोडले आणि गोरखपूरच्या गोरखनाथ मंदिराचे महंत अवैद्यनाथ यांचे शिष्य बनले. 1998 मध्ये गोरखपूरमधून सर्वात तरुण खासदार म्हणून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर सलग 37 वर्षानंतर युपीत पहिल्यांदाच एका पक्षाने सलग दुसऱ्यांदासत्तेत पुनरागमन केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in