"१९४७ मध्ये मोदींसारखं नेतृत्व असतं तर भारत सर्वाधिक समृद्ध असता"

स्वातंत्र्यानंतर पूर्वीच्या सरकारांच्या काळात भारताचा (India) अभिमान वाढेल असे एकही काम आजवर झालेले नाही
Cm Yogi Adityanath
Cm Yogi Adityanath

लखनऊ : उत्तरप्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Cm Yogi Adityanath) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना वादग्रस्त विधान केले आहे. ज्यामुळे देशात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युपीत आयोजित एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी ही विधान केलं आहे.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला भारतीय दृष्टी दिल्याने ही ओळख देशाला मिळाली आहे. 1947 मध्ये भारताकडे असे यशस्वी नेतृत्व असते तर भारत हा जगातील सर्वात समृद्ध, मोठी सामरिक शक्ती आणि आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली देश बनला असता.''

तसेच, स्वातंत्र्यानंतर पूर्वीच्या सरकारांच्या काळात भारताचा अभिमान वाढेल असे एकही काम आजवर झालेले नाही. फाळणीची चर्चा करणारे एक प्रकारे तालिबानीकरणाचे थेट समर्थन करत आहेत,'' असही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

''विरोधकांकडे आता कोणताही मुद्दा नाही, त्यांना सरदार पटेलांचा अपमान करायचा आहे. राष्ट्रीय नायक सरदार पटेल एका बाजूला आणि राष्ट्र तोडणारे जिना दुसऱ्या बाजूला. ते लोक जिनांना पाठिंबा देतात आणि आम्ही सरदार पटेलांना पाठिंबा देतो. आज जीना यांना पाठिंबा देणारे एक प्रकारे तालिबानलाही पाठिंबा देत आहेत. असही योगी आदित्यनाथ यांनी नमुद केलं आहे. ं

''2014 पूर्वी सत्ताधारी पक्षाचे असाल तर, आणि चेहरा पाहून घरकुल योजनेचा लाभ मिळत होता. आमदार तुमच्या जातीचा असेल तर लाभ मिळेल, नाहीतर मिळणार नाही. पण आज देशात 10 कोटी लोकांना घरे मिळाली आहेत,'' असंही त्यांनी यावेळी नमुद केलं. तर, ''इतिहासाने अशोक किंवा चंद्रगुप्त मौर्याला महान म्हटले नाही, तर चंद्रगुप्त मौर्याने ज्या सिकंदराचा (alexander the great) पराभव केला, त्याला महान म्हटले आहे. देशासोबत किती विश्वासघात झाला आहे. पण या सर्व प्रश्नांवर इतिहासकार मौन बाळगून आहेत, भारतातील जनतेला सत्य कळले तर समाज आणि देश उभा राहील,'' असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी यावेळी विरोधकांवर टिकास्त्र डागले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com