राज ठाकरेंना धमकावणाऱ्या खासदाराला थेट योगी आदित्यनाथांचा फोन...

Raj Thackeray|Brij Bhushan Sharan Singh| Yogi Adityanath| यूपीतल्या जनतेची माफी मागितल्या शिवाय राज ठाकरेंना अयोध्येत प्रवेश करु देणार नाही, असा इशारा ब्रिजभूषण सिंह यांनी दिला होता.
Raj Thackeray|Brij Bhushan Sharan Singh| Yogi Adityanath|
Raj Thackeray|Brij Bhushan Sharan Singh| Yogi Adityanath|Sarkarnama

Raj Thackeray ayodhya Visit

नवी दिल्ली : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावरून भाजप आणि मनसेत वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपच्या उत्तरप्रदेशातील खासदार ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh)यांनी विरोध दर्शविला आहे. यूपीतल्या जनतेची माफी मागितल्या शिवाय राज ठाकरेंना अयोध्येत प्रवेश करु देणार नाही, असा इशारा ब्रिजभूषण सिंह यांनी दिला होता.

Raj Thackeray|Brij Bhushan Sharan Singh| Yogi Adityanath|
थेट राज ठाकरेंनाच आव्हान देणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह कोण आहेत?

अशातच ब्रिजभूषण सिंह यांना थेट युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. योगी आदित्यनाथ यांनी ब्रिजभूषण सिंह यांना फोन केला असून त्यांना शांत बसायला सांगितले आहे. त्यामुळे सिंह शांत होतील, असा दावा मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी केला आहे.

राज ठाकरेंनी प्रसिद्धीसाठी टॅक्सीवाले, विद्यार्थी, चित्रपट क्षेत्रातील लोकांना मारहाण, शिवीगाळ केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर यूपी, बिहार, झारखंडच्या लोकांना शिवीगाळ करतात. २००७ पासून २०२०-२१ पर्यंत त्यांनी योगी आदित्यनाथ यांनाही अपशब्द वापरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पण आज अचानक त्याचं ह्रदयपरिवर्तन झाले आणि ते अयोध्येला येत आहेत, असे ब्रिजभूषण सिंह म्हणाले.

ब्रिजभूषण सिंह यांच्या या धमकीला आता मनसेने प्रत्युत्तर दिलं आहे. मनसे छोट्या-मोठ्या धमक्यांना भीक घालत नाही. ब्रिजभूषण सिंह यांनी स्वत:च्या प्रसिद्धीसाठी हा प्रकार केला असल्याचा दावा अभिजीत पानसे यांनी केला आहे.

मात्र ब्रिजभूषण सिंह देखील आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे बोलल जात आहे. राज ठाकरे अजानचा विरोध करोत की हनुमान चालिसाचं पठण करोत, त्याच्याशी आम्हाला काही घेणेदेणे नाही. माझी भूमिका पक्षाची भूमिका नसून माझी वैयक्तिक भूमिका आहे. मी उत्तर भारतीय आहे आणि राज ठाकरेंनी अनेकदा उत्तर भारतीयांचा अपमान केला आहे. भगवान श्रीरामही उत्तर भारतीय होते आणि भगवान राम यांच्या वंशजांना गेल्या २० वर्षांपासून ज्या व्यक्तीने मारहाण करण्याची भाषा केली, त्यांनी यासाठी माफी मागावी. अशी ठाम भूमिका ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com