'कंदाहार हायजॅक'वेळी प्रवाशांच्या सुटकेसाठी ममता स्वत: जाणार होत्या ओलीस!

कंदाहार विमान अपहरण प्रकरणी ममता बॅनर्जींनी स्वत: ओलीस जाण्याची तयारी दर्शविली होती, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.
yashwant sinha says mamata banerjee offered self in exchange for kandahar hostages
yashwant sinha says mamata banerjee offered self in exchange for kandahar hostages

कोलकता : इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे 1999 मध्ये अपहरण करुन ते अफगाणिस्तानमधील कंदाहारमध्ये नेण्यात आले होते. त्यावेळी प्रवाशांच्या सुटकेसाठी तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वत: ओलीस जाण्याची तयारी दर्शवली होती, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी आज केला. ममता या सुरवातीपासून लढवय्या होत्या आणि अजूनही त्या लढवय्या आहेत, असे सिन्हांनी स्पष्ट केले आहे.  

भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी आज तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी बोलताना त्यांनी कंदाहार विमान अपहरणाची आठवण सांगितली. इंडियन एअरलाईन्सचे विमान अपहरण करुन कंदाहारला नेण्यात आले होते. याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा सुरू होती. त्यावेळी केंद्रीय मंत्री असलेल्या ममतांनी विमानातील प्रवाशांच्या सुटकेसाठी स्वत: ओलीस जाण्याची तयारी दर्शविली होती. दहशतवादी जर भारतीयांची सुटका करण्यास तयार असतील तर मी बलिदान देण्यास तयार आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. 

विमान प्रवाशांची सुटका करण्यासाठी भारताला मसूद अजहरसह तीन दहशतवाद्यांची सुटका करावी लागली होती. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते तर यशवंत सिन्हा हे अर्थमंत्री होते. सिन्हा म्हणाले की, ममतांवर नंदिग्राममध्ये हल्ला झाला त्याच क्षणी मी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करुन त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ममतांना मी अगदी सुरवातीपासून पाहत आहेत. त्यावेळी त्या लढवय्या होत्या आणि आजही त्या तशाच आहेत. 

विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूलला विजयी करणे ही काळाची गरज आहे. यामुळे २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा पराभव निश्‍चित होईल. देशाला वाचविण्यासाठी मोदींना पराभूत करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्रिपद भूषविलेल्या सिन्हा यांनी भाजपच्या विद्यमान नेतृत्वासोबत झालेल्या मतभेदांनंतर २०१८ मध्ये पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांचे पुत्र जयंत सिन्हा हे सध्या भाजपचे खासदार असून, ते झारखंडमधील हजारीबाग मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. यशवंत सिन्हा हे आता तृणमूल काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेणार आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com