Xi Jinping : शी जिनपिंग होणार सलग तिसऱ्यांदा चीनचे अध्यक्ष ; भारतावर काय परिणाम?

China News : शी जिनपिंग हे चीनचे सर्वशक्तिमान नेते, भारत चीन सीमासंघर्ष कसा असेल?
Xi Jinping : Narendra Modi
Xi Jinping : Narendra ModiSarkarnama

Xi Jinping : चीनमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. चीन संसदेचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची मुदतवाढ देण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. चीन संसदेच्या अधिवेशनात एकमताने घेतलेला निर्णय घेतला आहे. शी जिनपिंग हे सगल तिसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. सगल तिसऱ्यांदा अध्यक्षपदावर निवड होणे, ही चीनच्या राजकारणातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे. (China News)

सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदावर आरूढ होणार असल्यामुळे चीनच्या राजकारणात शी जिनपिंग यांची ताकद वाढली आहे. जिनपिंग यांच्या राजकारणावरील पकड आणि त्यांची सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी होणे, ही चीनच्या राजकीय वाटचालीतील महत्त्वपूर्ण घडामोड आहे. चीन संसदेने यावर एकमताने घेतलेल्या निर्णयाने चीनची वाटचाल माओ काळातील एकचालकानुवर्ती पद्धतीने होणार, असे मानले जात आहे.

Xi Jinping : Narendra Modi
Manish Sisodia News : जेलमधून मनीष सिसोदिया यांचा केंद्राला इशारा : ‘साहेब मला तुरुंगात टाकून....’

चीनच्या नँशनल पीपल्स काँग्रेस या चीनच्या कायदेमंडळाच्या सर्वोच्च सभागृहात कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने शी जिनपिंग यांच्याबाबतीत हा प्रस्ताव मांडला होता. आणि नँशनल पीपल्स काँग्रेसच्या २५९२ सदस्यांनी एकमताने यास पाठिंबा दर्शविला. जिनपिंग हे ६९ वर्षांचे आहेत. जिनपिंग हे आजीवन राष्ट्राध्यक्ष राहतील, असे बोलेले जात आहे. त्यांच्याकडे चीनच्या मध्यवर्ती लष्करी आयोगाचेदेखील अध्यक्षपद आहे.

भारतावर काय परिणाम?

शी जिनपिंग यांच्या हाती चीनची सर्व सत्ता एकवटल्याने, याचे चीनवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक व्यवहारात परिणाम होणार असल्याचे अभ्यासक सांगतात. भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमावादवर वारंवर संघर्ष होत आहे. भारतातील विरोधी पक्षांनी सीमाभागात चीनने भारताच्या जमिनीवर ताबा मिळवल्याचा आरोप केला आहे. तर केंद्र सरकार या संघर्षाला सडतोड उत्तर दिले जाणार असल्याचे, सांगत आहेत.

Xi Jinping : Narendra Modi
Crime News : भाजपच्या माजी मंत्र्यांला कॉलगर्ल्सने दिला चोप? पोलिस म्हणतात...

शी जिनपिंग यांच्या हाती चीनची सार्वत्रिक सत्ता एकवटलेली आहे. त्यामुळे भारत आणि चीन यांच्यामध्ये सागरी मार्गावरुनही वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच भारताच्या शेजारील देशांबरोबर चीन आपले संबंध प्रस्थापित करत आहे. त्यांच्या या धोरणाला अधिक गती येवू शकते. आगामी काळात भारत आणि चीनचे संबंध कशा पद्धतीने राहतील, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in