BrijBhushan Singh News : लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या बृजभूषण सिंहांबाबत क्रीडामंत्री आज घेणार मोठा निर्णय

Wrestlers Protest News : महिला कुस्तीपटू जंतरमंतर मैदानावर 18 जानेवारीपासून धरणे आंदोलन करीत आहेत.
Wrestlers Protest News
Wrestlers Protest Newssarkarnama

Delhi News : गेल्या काही दिवसापासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह व कुस्तीपटूंची मैदानाबाहेर कुस्ती रंगली आहे. महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

दिल्लीत बृजभूषण सिंह यांच्याविरोधात या महिला कुस्तीपटूंनी आंदोलन सुरु केले आहे. महिला कुस्तीपटू जंतरमंतर मैदानावर 18 जानेवारीपासून धरणे आंदोलन करीत आहेत. यावेळी महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

काल (गुरुवारी) बृजभूषण सिंह आणि या महिला कुस्तीपटूंमधील वाद निर्णायक वळणावर आला आहे. काल रात्री उशिरापर्यंत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी आंदोलनकर्त्यां कुस्तीपटूंनी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यासोबत भोजन केले. रात्री दहा वाजता सुरु झालेली ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरु होती. आज (शुक्रवारी) पुन्हा क्रीडामंत्री ठाकुर आणि महिला कुस्तीपटूंची बैठक होणार आहे. या बैठकीत क्रीडामंत्री निर्णय घेणार आहेत.

Wrestlers Protest News
Parliament Budget Session 2023 : मोदी सरकारचे दाबे दणाणले ; अर्थमंत्रालयाची माहिती एकाने परदेशी लोकांना पुरवली...

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बृजभूषण सिंह यांना फोन करुन येत्या २४ तासात राजीनामा देण्यास सांगितले असल्याची माहिती आहे. मात्र ते राजीनामा देणार नसल्याच्या निर्णयावर ठाम आहे.

भारतीय कुस्ती महासंघाची २२ तारखेला बैठक आहे, यावेळी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेणार असल्याचे बृजभूषण सिंह यांनी सांगितले आहे. कुस्तीपटू आणि बृजभूषण सिंह यांच्यातील वाद संपण्याची चिन्ह दिसत नसल्याने बृजभूषण सिंह यांची पदावरुन हकालपट्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Wrestlers Protest News
Delhi News : धक्कादायक; महिला आयोगाच्या अध्यक्षांचाच विनयभंग !

गेल्या बुधवारपासून कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलित यांच्यासह ३० कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलनास सुरवात केली आहे. या प्रकरणाची दखल महिला आयोगाने घेतली आहे. क्रीडा मंत्रालयाला याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.

“प्रशिक्षक महिलांना त्रास देत आहेत. महासंघाचे काही आवडीचे प्रशिक्षक तर महिला प्रशिक्षकांनाही असभ्यतेने वागवतात. ते महिला खेळाडूंना त्रास देता. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनीही अनेक मुलींचं लैंगिक शोषण केलं आहे.” असा आरोप कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com