राजू शेट्टींची 'ही' मागणी केंद्र सरकार मान्य करणार?

Raju Shetti News : भविष्यात साखर उद्योगावर मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता...
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama

Raju Shetti News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी इथेनॉलच्या खरेदी दरात ५ रूपयांची वाढ करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव पंकज जैन (Pankaj Jain) यांना देत इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ करण्याची मागणी केली आहे. शेट्टींनी आज जैन यांची भेट घेत इथेनॉलच्या खरेदी दराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

शेट्टींनी दिलेल्या निवेदनात म्हटंल, ''ब्राझीलमध्ये (Brazil) गेल्या दोन वर्षातील घटलेल्या साखर उत्पादनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला सध्या चांगला दर मिळत आहे. मात्र भविष्यातील आंतरराष्ट्रीय बाजारातील ब्राझीलमध्ये वाढणाऱ्या साखर उत्पादनाचा विचार करता देशातील साखरेच्या दरामध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. यामुळे इथेनॉलच्या दरामध्ये प्रति लिटर ५ रूपयांची वाढ करावी, अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे.

देशात दिवसेंदिवस ऊसाचे क्षेत्र वाढत आहेत. गेल्या दोन वर्षापासून जवळपास ३५० लाख टनापेक्षा अधिक साखरेचे विक्रमी उत्पादन होत आहे. देशातंर्गत बाजारपेठेत २६० ते २७० लाख टन साखरेचा खप आहे. त्यामुळे भविष्यात ब्राझील व इतर देशात विक्रमी साखर उत्पादन झाल्यास भारतीय साखर उद्योगावर मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

Raju Shetti
Bhagat Singh Koshyari : शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; कोश्यारींचे राज्यपाल पद जाणार?

केंद्र सरकारने (Central Govt) सध्या ऊसापासून इथेनॉल (Ethanol) करण्यास परवानगी दिल्याने पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळले जावू लागले आहे. त्यामुळे गतवर्षी केंद्र सरकारचा जवळपास ५३ हजार कोटी रूपयांचे परकीय चलन वाचले आहे. ऊसाच्या रसापासून देशामध्ये गतवर्षी ८२५ कोटी लिटर इथेनॉल निर्मीती केली गेलीय. शेतकऱ्यांना ऊसाच्या पिकांपासून चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकरी (farmer) ऊसाच्या पिकाकडे वळले आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने या उद्योगातून सरकारला मिळणारा सर्वाधिक महसूल व पेट्रोल खरेदीमधून वाचणारे परकीय चलन या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारने इथेनॉलच्या खरेदी दरात ५ रूपयांची वाढ करण्याची मागणी शेट्टींनी केली आहे. त्यामुळे केंद्र सरकार राजू शेट्टींची ही मागणी मान्य करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com