शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या मंत्र्याच्या मुलावर मोदी कारवाई करणार का?

कॉंग्रेसच्या (Congress) महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे न्यायाची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या मंत्र्याच्या मुलावर मोदी कारवाई करणार का?
Priyanka Gandhi

नवी दिल्ली :कॉंग्रेसच्या (Congress) महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे न्यायाची मागणी केली आहे.आज (१९ नोव्हेंबर) सकाळी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. या मागणीचे पत्र त्या पंतप्रधान नरेंद्र मोंदीना (Pm Narendra Modi) पाठवणार आहेत. यावेळी त्यांनी कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाचेही स्वागत केले.

ऑक्टोबर महिन्यात लखीमपूर खीरी याठिकाणी शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झाला. यात केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने आपल्या गाडीने आठ जणांना चिरडले. यात चार शेतकरी आंदोलकाचा समावेश आहे. मी या सर्व शहीदांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांना केवळ न्यायाची अपेक्षा आहे. मात्र केंद्रीय संबंधित केंद्रीय मंत्री जोपर्यंत तुमच्या मंत्रीमंडळात आहेत, तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, असेही प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

Priyanka Gandhi
कर्जतमध्ये पोलिसच निघाला वाळू तस्कर

लखीमपूर खीरीमध्ये झालेल्या हिंसाचारात आपल्या मंत्रीमंडळातील एका केंद्रीय मंत्र्याचा मुलाचा समावेश आहे. या प्रकरणात त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा आरोप प्रियंका गांधी यांनी यावेळी केला. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, अशी मागणीही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

काल तुम्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. यावेळी आपण देशातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करुन हे कृषी कायदे मागे घेत असल्याचे सांगितले. मग आता लखीमपूर खीरी मध्ये झालेल्या हिंसाचारातील शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना न्याय देणे हे देखील तुमचे नैतिक कर्तव्य आहे. मात्र जो पर्यंत तुमच्या मंत्रीमंडळात उत्तरप्रदेशचे अजय मिश्रा केंद्रीय मंत्रीपदावर आहेत तो पर्यंत शहीद शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, असे प्रियंका गांधीनी या पत्रात म्हटले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह आजही मंत्री अजय मिश्रा एकाच व्यायपीठावर एकत्र येतात, हा शेतकरी आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या सातशेहून अधिक शेतकऱ्यांचा अपमान आहे. जर देशांतील शेतकऱ्यांच्यया प्रती तुमची नीयत खरचं साफ आहे तर आजच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, अशी मागणी प्रियंका गांंधी यांनी केली आहे. त्याचवेळी त्यांनी देशभरात ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घ्यावेत आणि शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक अनुदान द्यावे, अशीही मागणी प्रियंका गांधी यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in