आता लखनौचे नावही बदलणार? सीएम योगींच्या ट्विटनंतर चर्चांना उधाण

UP| Yogi Adityanath| lucknow| याआधी योगी सरकारने अनेक ठिकाणांची नावे बदलली आहेत.
 Yogi Adityanath
Yogi Adityanath Twitter/@YogiAdityanath

Yogi Adityanath latest political news

लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौचे नाव बदलण्याची चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) स्वागत करण्यासाठी सीएम योगी यांनी केलेल्या ट्विटमुळे लखनौचे नाव बदलण्याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी आपल्या ट्विटमध्ये, 'शेशावतार भगवान श्री लक्ष्मणजींच्या पवित्र नगरी लखनऊमध्ये हार्दिक स्वागत, असा उल्लेख केला आहे.

आमौसी विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना काढलेला फोटो टॅग करताना सीएम योगी यांनी हे ट्विट केले आहे. या ट्विटनंतर लखनऊचे नाव लक्ष्मणाच्या नावावर ठेवता येईल का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. असाही अंदाज लावला जात आहे कारण याआधी लखनौचे नाव बदलून लखनपुरी, लक्ष्मणपुरी आणि लखनपूर करण्याची मागणी केली जात आहे.

 Yogi Adityanath
मोदींच्या काळातच महागाईनेही केली ऐतिहासिक उच्चांकी कामगिरी

याआधी योगी सरकारने अनेक ठिकाणांची नावे बदलली आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अलाहाबाद आणि फैजाबादचे नाव बदलून प्रयागराज आणि अयोध्या करण्यात आले आहे. सीएम योगींच्या या ट्विटनंतर लोकांच्या या मागणीला आणखी बळ मिळत आहे. योगी सरकारने राज्यातील अनेक ठिकाणांची नावे अशाच प्रकारे बदलल्याचे त्यांचे म्हटले जात आहे.

यासोबतच काही दिवसांपूर्वी नैनी परिसराचे नाव बदलून अटलबिहारी वाजपेयी नगर, लखनऊमधील अमौसी विमानतळाचे नाव बदलून पंडित दीनदयाळ उपाध्याय विमानतळ आणि ओव्हर ब्रिजचे नामकरण श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या नावाने करण्यात आल्याची आठवण त्यांनी करून दिली.

लखनौचा इतिहास

लखनौचा इतिहास पाहिला तर हे शहर पूर्वी लक्ष्मण पुरी या नावाने प्रसिद्ध होते असे काही इतिहासातील काही दस्ताऐवजा स्पष्टपणे लिहिलेले आहे. त्यानंतर लखनपुरी झाली, जी नंतर लखनौला हलवण्यात आली. लखनौचे वर्णन कौशल राजचा एक भाग म्हणून करण्यात आले आहे. भगवान रामचंद्रांचा भाऊ लक्ष्मण याने हे शहर वसवले होते. लखनौ हे श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येपासून फक्त ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे. भाजप नेत्यांनी यापूर्वीच लखनौचे लक्ष्मण पुरी असे वर्णन केले आहे. भाजपचे दिग्गज नेते, लखनौचे खासदार आणि माजी मंत्री लालजी टंडन, यांनी आपल्य एका पुस्तकात लखनौचे वर्णन लक्ष्मण नगरी असे केले आहे. तर याबाबत अनेक पुरावेही देण्यात आले. लक्ष्मण टिळा, लक्ष्मण पुरी, लक्ष्मण पार्क यासह लखनौमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांना लक्ष्मण यांचे नाव देण्यात आले आहे. अशा स्थितीत योगी सरकारने लखनौचे नाव बदलून लक्ष्मण पुरी किंवा लखनपुरी केले, तर आश्वर्य वाटणार नाही. मात्र, सध्या तरी असा कोणताही प्रस्ताव नाही, असेही सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com