केजरीवाल यांचा पंजाब पॅटर्न गुजरातमध्ये यशस्वी ठरणार का?

Gujarat Assembly Elections | अरविंद केजरीवाल आज गुजरातचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करणार
Arvind Kejariwal
Arvind Kejariwal

Gujarat Assembly Elections : आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे (आप) अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) आज मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची घोषणा करणार आहेत. राज्यातील जनतेच्या मताच्या आधारे मुख्यमंत्री केजरीवाल त्यांच्या पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार आहेत.

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (३ नोव्हेंबर) ही माहिती दिली. 29 ऑक्टोबर रोजी केजरीवाल यांनी जनतेला एसएमएस, व्हॉट्सअॅप, व्हॉईस मेल आणि ई-मेलद्वारे पक्षाशी संपर्क साधावा आणि राज्यात पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असावा, हे सांगण्याचे आवाहन केले.

Arvind Kejariwal
Ashok Chavhan : चव्हाणांची तिसरी पिढी राजकारणात? श्रीजया यांच्या फ्लेक्सची एकच चर्चा!

पंजाब प्रमाणे गुजरातमध्येगी केजरीवालाचे जनतेला

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकांना ३ नोव्हेंबरपर्यंत आपले मत देण्यास सांगितले होते. त्याआधारे पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार 4 नोव्हेंबरला जाहीर केला जाणार आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या आप नेत्यांमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया, राष्ट्रीय सरचिटणीस इसुदान गढवी आणि सरचिटणीस मनोज सोराठिया यांचा समावेश आहे. केजरीवाल आज (४ नोव्हेंबर) अहमदाबादमध्ये पत्रकार परिषदेत पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा करतील. 182 सदस्यीय गुजरात विधानसभेसाठी 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. तर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंजाब विधानसभा निवडणूकीत अशाच प्रकारे नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊन भगवंत मान यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवारी दिली होती. त्यात ते यशस्वी ठरले होते. पंजाबनंतर त्यांनी गुजरातमध्येही लागू केलेला हा पॅटर्न यशस्वी ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Arvind Kejariwal
Tejasvi Surya : दोन युवांची लढाई : आदित्य ठाकरेंवर उतारा म्हणून भाजपकडून 'तेजस्वी' मैदानात!

गुजरातमध्ये 1995 पासून भाजपची सत्ता आहे. पण यावेळी आम आदमी पक्षाच्या प्रवेशाने ही निवडणूक रंजक बनली आहे. कारण भारतीय जनता पक्षाला 1995 पासून भाजपलला गुजरातमधील विजय अखंडित ठेवायचा आहे. पण त्याचवेळी प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आपल्या प्रचाराला धार देण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे.

निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, एकूण 182 सदस्यीय गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी आणि दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान होणार आहे. तर हिमाचल प्रदेशात मतमोजणीबरोबरच ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यावेळी निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे आणि आयोगाचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com