Rahul Gandhi on Disqualification: खासदारकी रद्द का केली? राहुल गांधींनी सांगितलं लोकसभेत काय घडलं...

Rahul Gandhi news | आज राहुल गांधी यांनी आपल्यावर झालेल्या कारवाईवर पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य केलं आहे.
Rahul Gandhi on Disqualification
Rahul Gandhi on DisqualificationSarkarnama

Rahul Gandhi Speaks on Disqualification : लोकसभेत मी अदानी - आणि मोदी यांच्यातील संबंधांवर बोलायचं होतं. त्यासाठी मी लोकसभा अध्यक्षांकडे बोलण्याची परवानगी मागितली. पण मला बोलण्याची परवानगी दिली गेली नाही. मी बोलण्याची परवानगी मागूनही मला बोलू दिलं नाही. माझ्या पुढच्या वक्तव्याला घाबरुन सभागृहात मोठा गदारोळ झाला, त्यातच माझे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्याप्रकरणी गुजरातमधील सुरत न्यायालयाने त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर काल (दि. २४ मार्च) त्यांची संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं. त्यांच्यावर झालेल्या या कारवामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर आज राहुल गांधी यांनी आपल्यावर झालेल्या कारवाईवर पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य केलं आहे.

भाजपकडून देशाला भरकटवण्याचे प्रयत्न सरु आहेत. देशाच्या न्यायव्यवस्थेवर हल्ला केला जात आहे. पण काहीही झालं तरी मी प्रश्न विचारणं सोडणार नाही. अदानीच्या प्रश्नावरुन लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या प्रश्नांवरुन लक्ष हटवण्साठी ही कारवाई केली गेली. भाजप माझ्या प्रश्नांची उत्तरे का देत नाही. अदानीला वीस हजार कोटी कोणी दिले. असेही राहुल गांधींनी विचारलं आहे.

Rahul Gandhi on Disqualification
Rahul Gandhi On Adani : अदानींच्या कंपनीत २० हजार कोटी कुणी गुंतवले? राहुल गांधींचा थेट मोदींना सवाल!

अदानी-मोदी यांच्यातील संबंध काय, आदानीच्या शेल कंपनीत गुंतवलेले २० हजार कोटी कुणाचे आहेत, अदानी आणि मोदींमधील संबंध सर्वांना माहिती आहेत. ते २० हजार कोटी अदानींचे नाहीत तर ते कोणाचे आहेत आणि एवढे पैसे आले कुठून, असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे.

यांच्या मते अदानी म्हणजे देश आणि देश म्हणजे अदानी. तुम्ही या सर्वांची चौकशी करा, जर मोदी दोषी आढळले तर त्यांना जेलमध्ये टाका, दुसरे कोणी आढळले तर, त्याला जेल मध्ये टाका,अदानी भ्रष्ट आहेत हे जनता जणते, मग मोदी अदानींना का वाचवत आहेत. पण पंतप्रधान मोदी आणि अदानी यांचे संबंध बाहेर काढणारच, महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण काहीही झालं तरी मी खचलो नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com