पंतप्रधान मोदी हे `बिग बूल` झुनझुनवालासमोर उभे का?

एका व्यापाऱ्यासमोर देशाचा पंतप्रधान (PM Narendra Modi) उभे असल्याची झाली होती टीका..
Narendra Modi and Rakesh Jhunjhunwala
Narendra Modi and Rakesh JhunjhunwalaSARKARNAAM

नवी दिल्ली : अब्जाधीश आणि शेअर बाजारातील `बिल बूल` राकेश झुनझुनवाला यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची भेट सोशल मिडियात चांगलीच चर्चेची ठरली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून या भेटीचे चित्र प्रसिद्ध करण्यात आले. या चित्रात झुनझुनवाला हे खुर्चीत बसलेले आणि मोदी हे उभे असल्याचे दिसत आहेत. त्यावरून एका व्यापाऱ्यासमोर देशाचा पंतप्रधान उभा असल्याबद्दल अनेकांनी टीका केली.

या भेटीत झुनझुनवाला यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही होत्या. झुनझुनवाला हे मधुमेहामुळे ग्रस्त आहेत. त्यांच्या पायाला त्यामुळे इजा झाली आहे. त्यामुळे ते व्हील चेअरवर बसूनच हालचाल करतात. परिणामी पंतप्रधानांनी उभे राहूनच त्यांच्याशी गप्पा मारल्या. मात्र याचा अनेकांनी उलटा अर्थ लावत व्यापाऱ्यासमोर पंतप्रधान उभे असल्याचे सांगत सोशल मिडियावर पोस्ट लिहिल्या.

Narendra Modi and Rakesh Jhunjhunwala
राकेश झुनझुनवालांसमोर पंतप्रधान मोदी हात बांधून उभे राहतात तेव्हा...

झुनझुनवाला हे ज्या दिवशी मोदींनी भेटल त्याच दिवशी त्यांनी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची भेट घेतली होती. त्या भेटीत ते व्हिल चेअरवर बसल्याचे दिसत आहे. पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या फोटोत व्हिल चेअर दिसत नसल्याने अनेकांचा गैरसमज झाला. त्यातून राकेश झुनझुनवाला यांच्यासारखे बना, म्हणजे पंतप्रधान उभे राहून तुमच्यासोबत फोटो काढून शेअर करतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

मोदी यांनी या भेटीबद्दल ट्विट करताना एकमेवाद्वितीय राकेश झुनझुनवाला यांना भेटून अतिशय आनंद झाला. भारताबद्दल त्यांनी अतिशय महत्वपूर्ण आणि सकारात्मक माहिती दिली, असे म्हटले होते. या भेटीच्या वेळी झुनझुनवाला यांच्या पांढऱ्या रंगाच्या चुरगळलेल्या शर्टबद्दलही सोशल मिडियात चर्चा रंगली. झुनझुनवाला यांचा मोदींसोबत उभे असलेला फोटो जारी झालेला आहे. मग त्यांना उभे राहता येत नाही कशावरून, असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला. त्यावरही तेथेच उत्तर मिळाले. त्यांना फार वेळ उभे राहता येत नसल्याने ते फोटोपुरते उभे राहिले असावेत. पंतप्रधानांनी त्यांना बसायला सांगून स्वतः उभे राहून गप्पा मारल्या यात त्यांचे सौजन्य दिसते अशा शब्दांत काहींनी मोदींचे कौतुक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com