देशातील हिंसाचाराच्या घटनांवर पंतप्रधान मोदी शांत का?; 13 विरोधी नेत्यांचा सवाल

Voilence| PM Narendra Modi| Sonia gandhi| sharad Pawar| गेल्या काही महिन्यांपासून देशात सामाजिक हिंसेच्या घटना वाढत चालल्या आहेत.
देशातील हिंसाचाराच्या घटनांवर पंतप्रधान मोदी शांत का?; 13 विरोधी नेत्यांचा सवाल
Why is Prime Minister Modi silent on incidents of violence in the country ?

नवी दिल्ली: देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि द्वेषपूर्ण भाषणे आणि सामाजिक हिंसेच्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी बाळगलेले मौन धक्कादायक आहे, अशी टीका देशातील 13 प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनी केली. तसेच, या हिंसक घटनांमधील संशयितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी शनिवारी संयुक्त निवेदनाद्वारे पंतप्रधान मोदींकडे करण्यात आली.

काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी (Sonia gandhi) , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख तेजस्वी यादव, माकपचे महासचिव सीताराम येचुरी, भाकपचे महासचिव डी. राजा नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला, आदी प्रमुख नेत्यांनी हे निवेदन प्रसिद्ध केले आहे. मात्र, यामध्ये शिवसेना, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष व आम आदमी पक्ष या पक्षांच्या नेत्यांचा समावेश नाही!

Why is Prime Minister Modi silent on incidents of violence in the country ?
रघुनाथ पाटील म्हणाले, आता संघर्षाची वेळ आली आहे...

गेल्या काही महिन्यांपासून देशात सामाजिक हिंसेच्या घटना वाढत चालल्या आहेत. पण या हिंसेविरोधात पंतप्रधान मोदींनी शब्दही उच्चारलेला नाही, त्यामुळे सत्ताधारी व प्रशासनाकडून या अशा हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या आणि हिंसेला कारणीभूत असणाऱ्या सशस्त्र जमावाला प्रोत्साहन दिले जात असल्याचे द्योतक आहे.

देशात विविध धर्मांच्या धार्मिक श्रद्धा, उत्सव, भाषा, खाद्यपदार्थ, पोषाख, अशा विविध मुद्दय़ांवरून देशातील सत्ताधाऱ्यांकडून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. देशभरात द्वेषपूर्ण भाषणांचे प्रकार वाढू लागले आहे, चिथावणीखोर भाषण करणाऱ्यांना ‘सरकारी संरक्षण’ दिले जात आहे. सामाजिक तणाव निर्माण करण्याचा आणि हा तणाव वाढवण्यासाठी हा सूनियोजित कट रचला जात आहे. चिथावणीखोर, हिंसक भाषणांद्वारे लोकांच्या भावना भडकावल्या जात आहेत, सशस्त्र धार्मिक मिरवणुका काढून धार्मिक हिंसेच्या घटना जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत, अशी घणाघाती टीकाही विरोधीपक्षनेत्यांनी निवेदनातून केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.