Artical 370 : ३७० कलम हटविणारे `शिवनेरी`वर भगवा का फडकवू शकत नाही; खासदार कोल्हेंचा मुळावरच घाव

आपण कोणत्या विकासाच्या दिशेने जात आहोत
Amol Kolhe News
Amol Kolhe News Sarkarnama

Artical 370 : देशातील माहौल बदलतो आहे. वातावरण बिघडतंय. कारण हिंदू - मुस्लिमांच्या बरोबरीने दलित-सवर्णातील दरी वाढताना दिसते आहे, अशा शब्दांत शिरूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारला काल (ता.७) आरसा दाखवला.

जम्मू-काश्मिरसंदर्भातील घटनेचं ३७० कलम,जर केंद्र हटवू शकतं, मग भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांमध्ये सुधारणा करून शिवनेरीवर भगवा ध्वज लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान का करु शकत नाही? असा रोकडा सवाल खा. इतिहासप्रेमी खा.डॉ. कोल्हे यांनी केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत ते बोलत होते.गरीबांना घरे देण्याच्या राष्ट्रपतींच्या वक्तव्याचा धागा पकडीत त्यांनी सरकारच्या धोरणातील विरोधाभासावर बोट ठेवले.

Amol Kolhe News
Sanjay Raut News : संजय राऊतांना न्यायालयाचा दिलासा; अटकपुर्व जामीन मंजूर

एकीकडे आपण गरीबांना घरे देण्याच्या गोष्टी करतो, तर दुसऱ्या बाजूला भोसरी येथील रेडझोन हद्द २००० यार्ड घोषित करुन ५ लाख कुटुंबांची घरे अनधिकृत ठरवत त्यांच्यावर टांगती तलवार ठेवतो. काही ठिकाणी ही हद्द २००० यार्ड, तर काही ठिकाणी ती २७० ते ५०० मीटर आहे,याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्वातंत्र्याच्या अमृत काळात ब्रिटिश कायद्याचा त्याग करून पिंपरी, चिंचवडसह देशातील अन्य ठिकाणची रेडझोनची मर्यादा ५०० मीटर करण्याची मागणी त्यांनी केली.आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्नांसह देशातील बिघडणारे वातावरण, धोरण व कायद्यातील त्रुटींवर बोट ठेवत अस्खलित हिंदीतील प्रभावी भाषणामुळे त्यांनी पुन्हा सभागृह गाजवले.

कुणी सवर्णांचे पाणी प्यायला म्हणून मारहाण होते, तर, कुणी मिशी वाढवली म्हणून वा लग्नासाठी जाणारा तरुण घोडीवर बसला म्हणून मारहाण होते. अशा परिस्थितीत आपण कोणत्या विकासाच्या दिशेने जात आहोत अशी विचारणा खा.कोल्हेंनी केली.धर्म अभिमानाचं रुपांतर धार्मिक उन्मादात होतं, तेव्हा अमृतकाळात जे हलाहल निर्माण होईल, त्याची जबाबदारी कोण घेणार? त्याचे परिणाम कोण भोगणार? असा थेट सवाल त्यांनी केला.

Amol Kolhe News
Congress : प्रदेशाध्यक्ष नसतानाही बाळासाहेबांनी मध्यस्थी केली होती, त्यांचा सन्मान झालाच पाहिजे...

राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात उल्लेख केलेल्या 'धोरण लकव्या'चा अनुभव आपण घेत असल्याचे सांगत त्यांनी 'बैल' हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी मी गेल्या ३-४ वर्षांपासून करतो आहे. एकीकडे आपण गायीला माता संबोधून तिची पूजा करतो, मात्र गोवंश वृद्धिसाठी अत्यावश्यक असलेला बैलाचा वाघ, सिंह, अस्वल आणि माकडांचा समावेश असलेल्या संरक्षित सूचीत करतो, या विरोधाकडे लक्ष वेधत जलिकटू, रेकला, बैलगाडा शर्यत यांच्यावरील बंदीसाठी सातत्याने न्यायालयात जाण्यामागे आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा वास सरकारला येत कसा नाही, असे ते म्हणाले.

गोवंश मांसाच्या निर्यातीत दहाव्या स्थानी असलेला भारत गेल्या काही काळात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधताना दिवसा वीज पुरवठा होत नसल्याने रात्री शेतीला पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांवर बिबट्यांचे हल्ले होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने बिबट्यांच्या प्रजोत्पादनावर नियंत्रण आणण्यासाठी धोरण तयार करावे अशी मागणी त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com