युपीत मुस्लीमांना तिकीट का देत नाहीत? अमित शहांनी दिले रोखठोक उत्तर

UP Assembly Election 2022|Yogi Adityanath| Amit Shah उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले आहेत.
UP Assembly Esection 2022- Amit Shah
UP Assembly Esection 2022- Amit ShahSarkarnama

मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे (UP Assembly Election 2022) तीन टप्पे पार पडले आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. असे असतानाच राजकीय पक्षांमधील राजकारणही अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. अशातच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी राज्यात 80 विरुद्ध 20 अशी लढाई सुरु आहे, असे विधान केले, तेव्हापासून ही निवडणूक हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी झाली असल्याची चर्चा राज्यात जोर धरु लागली आहे. याप्रकरणी विरोधी पक्षांनीही भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे.

भाजपा मुस्लिमांना तिकीट का देत नाही?' असा सवाल त्यांना विचारण्यात आला, या प्रश्नाला मंत्री अमित शहा यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रोखठोक उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे युपीत भाजप यंदाच्या निवडणूकीत 300 पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा एकदा सरकार बनवेल असा दावा केला आहे.

UP Assembly Esection 2022- Amit Shah
पक्ष सोडणाऱ्यांना बघून घेऊ! आमदार राजू पाटलांचा नेत्यांना जाहीर दम

यूपीची ही निवडणूक हिंदू, मुस्लिम किंवा यादवांची निवडणूक नाही. योगीजी मतांच्या टक्केवारीबद्दल बोलले, हिंदू-मुस्लिमबद्दल बोलले नाहीत, त्यांनी कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा उल्लेख केला नाही, त्यांच्या बोलण्याचा एकच अर्थ होता की राज्यातील ऐंशी टक्के जनता भाजपसोबत आहे, बाकीची जनता आपापल्या सोयीनुसा अर्थ लावत आहे. तसेच ध्रुवीकरण तर नक्की होत आहे. हे गरीबांचे आणि शेतकऱ्यांचे ध्रुवीकरण होत आहे. भाजपाच्या राज्यात शेतकऱ्यांना कल्याणकारी योजनेचे पैसे मिळत आहेत. आम्ही व्होट बँकेच्या भूमिकेतून पाहत नाही. ज्यांचा अधिकार असेल त्यांच्या बाजूने सरकार आहे, असे स्पष्टीकरण अमित शहा यांनी दिले आहे.

'भाजप प्रत्येक गरजूंसोबत होती, आहे आणि सदैव राहील' मतदानाच्या पद्धतीला ध्रुवीकरण म्हणता येणार नाही. आम्ही कोणतीही कसर सोडलेली नाही. समाजातील प्रत्येक घटकाला आमच्याकडून फायदा होत आहे. त्यासाठी आम्ही जात-धर्म पाहिला नाही. जो पात्र होता त्याला लाभ देण्यात आला. भाजपने शेतकरी, तरुण, महिला, सर्व घटकांसाठी काम केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व धर्म आणि जातींच्या विकासाच्या योजनांवर काम झाले आहे.

निश्चितच आम्ही योगींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत, योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही निवडणूक लढवणार आहोत. कितीही जागा आल्या तरी मुख्यमंत्री भाजपचाच होणार. यावेळीही भाजप 300 पेक्षा जास्त जागा आणेल, असा माझा दावा अमित शहांनी केला आहे. उत्तर प्रदेशसह उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेशसह इतर चार राज्यांमध्येही विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या चांगल्या कामगिरीचं कारण सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com