कोव्हॅक्सिनबाबत लवकरच 'गुड न्यूज'; डॉ. भारती पवार यांचे सुतोवाच

डब्लूएचओने फायजर, मॉडर्ना आणि कोव्हिशिल्ड या कोरोना लशींना मान्यता दिली आहे.
Dr. Bharati Pawar, Covaxin
Dr. Bharati Pawar, CovaxinFile Photo

नवी दिल्ली : देशातील भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोव्हॅक्सिन (Covaxin) या कोरोना लशीला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अद्याप मान्यता दिलेली नाही. यामुळे ही लस घेतलेल्या भारतीयांना परदेशांत प्रवास करण्यात अडचणी येत आहेत. ही मान्यता लवकरच मिळण्याची शक्यता असल्याचे सुतोवाच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शुक्रवारी दिली.

भारत बायोटेकने लशीबाबतची सर्व कागदपत्रे डब्लूएचओकडे जुलैमध्ये सादर केली होती. पण अद्याप या लशीला WHO नं मान्यता दिलेली नाही. जगातील आघाडीची विद्यापीठेही त्यांच्या देशांनी अथवा डब्लूएचओने मान्यता दिलेली लस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच परवानगी देत आहेत. कोव्हॅक्सिन घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात गेल्यानंतर सक्तीच्या हॉटेल विलगीकरणात राहावे लागेल. हॉटेलमध्ये 14 दिवस राहणे हे विद्यार्थ्यांसाठी खर्चिक आहे, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

Dr. Bharati Pawar, Covaxin
पुण्याने गाठला कोरोना रुग्णांचा पाच लाखांचा आकडा

डब्लूएचओने फायजर, मॉडर्ना आणि कोव्हिशिल्ड या कोरोना लशींना मान्यता दिली आहे. परंतु, या लशींच्या यादीत कोव्हॅक्सिन नाही. या लशीच्या परिणामकारकतेबाबत आणखी माहिती सादर करावी लागेल, असे डब्लूएचओचे म्हणणे होते. यावर भारत बायोटेकने म्हटले होते की, डब्लूएओची मान्यता मिळवण्यासाठी आवश्यक असलेली 80 टक्के कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. उरलेली कागदपत्रे जून महिन्यात सादर केली जातील. लवकरात लवकर आम्हाला ही परवानगी मिळेल, अशी अपेक्षा आहे. आता डॉ. भारती पवार यांनीही कोव्हॅक्सिनला लवकरच मान्यता मिळेल, असे संकेत दिले आहेत.

कोव्हॅक्सिनचा समावेश इमर्जन्सी यूज लिस्टिंगमध्ये (ईयूएल) करावा, यासाठी डब्लूएचओकडे अर्ज केला आहे. जुलै अथवा सप्टेंबर महिन्यात लशीला मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे, असे भारत बायोटेकने याआधी म्हटले होते. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पुन्हा एकदा जग खुले झाले आहे. भारतीयांनाही जगाची कवाडे उघडी झाली आहेत. तसेच, परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा शिक्षण सुरू झाले आहे. परंतु, यात एक नवीन अडचण निर्माण झाली आहे. डब्लूएचओने कोव्हॅक्सिनला मान्यता दिलेली नाही.

कर्णबिधर मुलांसाठी महत्वाचा निर्णय

मुलं जन्माला आल्यानंतर कर्णबधिरतेबाबत तपासणी व निदान करण्यासाठी स्वतंत्र मोहिम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती डॉ. भारती पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या तपासणीमुलं लवकरात लवकर निदान होऊन लगेचच उपचार सुरू करणं शक्य होईल. आयुष्यमान भारत अंतर्गत ही तपासणी व उपचार सोपी होणार आहे, असंही भारती पवार यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com