कोण असेल CDS बिपीन रावत यांचा उत्तराधिकारी ?

सीडीएस रावत (Bipin Rawat) यांच्या निधनानंतर लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे (Manoj Naravane) हे देशातील सर्वात वरिष्ठ लष्करी अधिकारी बनले आहेत.
CDS Bipin Rawat
CDS Bipin Rawat

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपीन रावत (Bipin Rawat) यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाचा थेट परिणाम देशाच्या सर्वोच्च लष्करी पदावरही झाला आहे. यासाठी सध्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे (Manoj Mukund Naravane) यांच्याकडे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

लष्कराच्या तिन्ही शाखांच्या प्रमुखांमध्ये जो वरिष्ठ असेल त्याला ही जबाबदारी दिली जाते. यापूर्वी ही जबाबदारी सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्याकडे होती. मात्र जनरल रावत यांचा मृत्यूनंतर तिन्ही दलामंध्ये प्रमुखांमध्ये सर्वात ज्येष्ठ असल्याने जनरल नरवणे यांना ही जबाबदारी मिळाली आहे. हवाई दलाचे प्रमुख, एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि नौदल प्रमुख आर हरी कुमार हे लष्कराच्या इतर दोन शाखांपेक्षा कनिष्ठ आहेत, त्यामुळे दोघेही हे पद धारण करू शकत नसल्याने जनरल मनोज नरवणे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

CDS Bipin Rawat
मोठी बातमी : मुलींच्या लग्नाचे वय वाढणार... मंत्रिमंडळाने दिली मंजूरी

डिसेंबर 2019 मध्ये जेव्हा सरकारने पहिल्यांदा CDS पदासाठी जनरल रावत यांच्या नावाची घोषणा केली तेव्हा CDS पदासह त्या कमिटीचे अध्यक्षपदही बिपिन रावत यांच्याकडे गेले. मात्र, त्यापूर्वी लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये समन्वय राखण्यासाठी लष्करात चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्षपद होते. त्यावेळी तीन प्रमुखांपैकी ज्येष्ठ हे पद भूषवत असत. आता सीडीएसचे पद रिक्त असल्याने जुनी परंपरा पूर्ववत करण्यात आली आहे. जेणेकरून लष्करातील परस्पर समन्वयाच्या कामात कोणतीही अडचण येणार नाही.

जेव्हा सरकार पुन्हा नव्या CDSची घोषणा करेल तेव्हा ते पद आपोआप त्यांच्याकडे जाईल. तिन्ही प्रमुखांमध्ये वरिष्ठ असल्याने सरकार लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनाही सीडीएस बनवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

31 डिसेंबर 2019 रोजी बिपिन रावत यांनी लष्करप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी 28 वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर बिपिन रावत यांची देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यापूर्वी नरवणे हे लष्कर उपप्रमुख म्हणून कार्यरत होते. नरवणे यांनी सप्टेंबर 2019 मध्ये लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी लष्कराच्या पूर्व कमांडचे नेतृत्व केले. जी चीनसोबतच्या 4000 किमी लांबीच्या भारतीय सीमेवर लक्ष ठेवते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com