Karnataka Next CM: काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक संपली; मुख्यमंत्रीपदाचा निर्णय नाहीच, चेंडू खर्गेंच्या कोर्टात

Karnataka CM News : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार?
Karnataka CM News
Karnataka CM News Sarkarnama

Karnataka Election Result: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 224 जागांपैकी 135 जागांवर विजय मिळवला. तर भाजपला फक्त 66 जागांवर विजय मिळवण्यात यश आले. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने आता कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसमध्येच रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. आता यावर काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Karnataka CM News
Karnataka Next CM: कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार?; डी के शिवकुमार यांनी दिले स्पष्ट संकेत

या पार्श्वभूमीवरच आज बंगळुरूमधील शांगरी-ला हॉटेलमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबतची चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीनंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाची निवड काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निर्णयावर सोडण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्रीपदासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, अंतिम निर्णय आता काँग्रेस हायकमांडच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे आता काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By : Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com