Karnataka Next CM: कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार?; डी के शिवकुमार यांनी दिले स्पष्ट संकेत

Karnataka Election Result: माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि डी.के.शिवकुमार यांच्यापैकी मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?
Karnataka Next CM
Karnataka Next CMSarkarnama

Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 224 जागांपैकी 135 जागांवर विजय मिळवला. तर भाजपला फक्त 66 जागांवर विजय मिळवण्यात यश आले. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने आता कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. असं असलं तरी मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसमध्येच रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. यातच आता डी के शिवकुमार यांनी स्वतः याबाबत संकेत दिले आहेत.

Karnataka Next CM
Karnataka Chief Minister : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेस अध्यक्ष खर्गेंचे मोठे विधान

डी के शिवकुमार म्हणाले, "माझे आणि सिद्धरामय्या यांचे मतभेद आहेत, असं काही लोक म्हणतात. पण मला सांगायचं आहे की, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. मी पक्षासाठी अनेक त्याग केलेत. मी सिद्धरामय्या यांच्या पाठीशी उभा राहिलो. मी सिद्धरामय्या यांना पाठिंबा दिला आहे", अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

कर्नाटक निवडणुकीचा निकाल आणि मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी देखील भाष्य केले आहे. खर्गे म्हणाले, काँग्रेस पक्ष सर्वांच्या संमतीने निर्णय घेऊन मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडेल. सर्व समाजातील लोकांनी काँग्रेसला निवडणुकीत मतदान केले. निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी पक्ष कसोशीने प्रयत्न करणार आहे", असं ते म्हणाले.

Karnataka Next CM
Karnataka Election Result: कर्नाटकच्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस अन् 'जेडीएस'च्या 'या' बड्या नेत्यांचा पराभव

दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांच्यापैकी कुणाची वर्णी लागणार? याकडे कर्नाटकच्या जनतेचे लक्ष लागले आहे.

(Edited By : Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com