ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका नाहीतर...! WHO चा गंभीर इशारा

अमेरिकेत सोमवारी एका दिवसांत तब्बल 10 लाख रुग्ण आढळून आले आहेत.
WHO Warned About Omicron Variant

WHO Warned About Omicron Variant

Sarkarnama

स्टॉकहोम : जगभरात वेगाने वाढत असलेल्या ओमिक्रॉन (Omicron) बाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गंभीर इशारा दिला आहे. या विषाणुला हलक्यात घेऊ नका, अन्यथा नव्या आणि अधिक घातक व्हेरिएंटचा धोका वाढू शकतो, असा संघटनेने स्पष्ट केलं आहे. मागील काही दिवसांत वणव्याप्रमाणे पसरणाऱ्या ओमिक्रॉनचे गंभीर परिणाम जाणवत नसले तरी त्याचा पुढील धोका WHO कडून स्पष्ट करण्यात आला आहे. (WHO Warned About Omicron Variant)

WHO च्या वरिष्ठ आपत्कालीन अधिकारी कैथरीन स्मॉलवुड यांनी हा इशारा दिला आहे. वाढता संसर्ग दर विपरीत परिणाम करू शकतो. ओमिक्रॉन जेवढा अधिक पसरत आहे, तेवढा तो अधिक वेगाने बदलूही शकतो. त्यातून नव्या व्हेरिएंटचा जन्म होण्याची शक्यता जास्त आहे. ओमिक्रॉन हा डेल्टाच्या तुलनेत तितका जीवघेणा नसला तरी पुढील व्हेरिएंटबाबत आपण काही सांगू शकत नाही.

<div class="paragraphs"><p>WHO Warned About Omicron Variant</p></div>
अमेरिकेत कोरोनाची त्सुनामी; एका दिवसातील रुग्णसंख्येनं मोडला जागतिक विक्रम

कोरोनाची महामारी सुरू झाल्यापासून युरोपात आतापर्यंत सुमारे दहा कोटी रुग्ण आढळून आले आहेत. 2021 च्या शेवटच्या आठवड्यात 50 लाखांहून अधिक रुग्ण आढळले. स्मॉलवुड म्हणाल्या, आपण सध्या धोकादायक टप्प्यात आहोत. पश्चिमी युरोपमध्ये संसर्गाचा दर खूप वेगाने वाढत आहे. त्याचा प्रभाव नेमका किती आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अमेरिकेमध्ये कोरोनाची (Corona) जणू त्सुनामी (Tsunami) आली असून एका दिवसांतील सर्वाधिक कोरोना रुग्णांचा विक्रम मोडला आहे. सोमवारी अमेरिकेत (America) तब्बल 10 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत कोणत्याच देशात एका दिवसात एवढ्या रुग्णांची नोंद झालेली नाही.

<div class="paragraphs"><p>WHO Warned About Omicron Variant</p></div>
ओमिक्राॅनचा धसका पुण्यात : आठवीपर्यंतच्या शाळा तातडीने बंद, मास्क नसेल तर मोठा दंड

दक्षिण आफ्रिकेत (South Africa) पहिल्यांदा आढळलेल्या ओमिक्रॉनने आता जगातील अनेक देशांना धडकी भरवली आहे. सर्वाधिक फटका अमेरिकेला बसू लागला आहे. या विषाणूचा अत्यंत वेगाने संसर्ग पसरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील आठवड्यात अमेरिकेत एका दिवसांत सुमार 9 लाख 90 हजार कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. आठवडाभरातच हा आकडा दुप्पट झाला आहे.

दोन वर्षांपूर्वी जगभरात महामारी सुरू झाल्यापासूनचा ही एका दिवसांतील सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे. मागील वर्षी अमेरिकेबाहेर एका दिवसात सर्वाधिक सुमारे 4 लाख 14 हजार रुग्ण आढळले होते. अमेरिकेतील अनेक जण घरी चाचणी करत असून त्याची नोंद सरकारकडे होत नसल्याने कोरोनाचा आकडा यापेक्षा अधिक असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पण रुग्णसंख्या वाढत असली तरी अद्याप मृत्यूचा आकडा आटोक्यात असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com