Owaisi Criticized PM Modi: मणिपूर जळत असताना...: केरळ स्टोरी चित्रपटावरुन ओवेसींचा पंतप्रधांनांवर हल्लाबोल

कर्नाटकात १० मे रोजी मतदान होणार असून ८ मे रोजी निवडणूक प्रचार संपणार आहे.
Owaisi Criticized PM Modi:
Owaisi Criticized PM Modi: Sarkarnama

Asaduddin Owaisi Criticized On PM Modi: मणिपूर जळत आहे. लोक घर सोडून पळून जात आहेत पण पंतप्रधान तिथल्या निवडणुकीत एका खोट्या चित्रपटाचा (द केरळ स्टोरी) प्रचार करत आहेत, अशी घणाघाती टीका ल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी केली आहे.

कर्नाटकात १० मे रोजी मतदान होणार असून ८ मे रोजी निवडणूक प्रचार संपणार आहे. राज्यातील 224 जागांचे निकाल 13 मे रोजी लागणार आहेत. कर्नाटकमध्ये प्रचार करताना ओवेसी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात सुरू आहे आणि बजरंग दल आणि नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट द केरळ स्टोरी यासारखे मुद्दे चर्चेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिणेकडील राज्याच्या प्रचारात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत ओवेसी यांनी अनेक मुद्द्यांवरून पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) हल्लाबोल केला आहे.

Owaisi Criticized PM Modi:
Madha News : माढ्यात राष्ट्रवादी भाकरी फिरवणार; संजीवराजेंसाठी चाचपणी...

एकीकडे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी जवानांची हत्या करत आहेत, मणिपूर हिंसाचाराच्या आगीत जळत आहे आणि पण आपल्या देशाचे पंतप्रधान कर्नाटकात प्रचारात व्यस्त असल्याची टीका ओवेसी यांनी केली आहे. “द केरळ स्टोरी' हा खोटा चित्रपट आहे. फक्त आमचा बुरखा दाखवून पैसे कमवायचे आहेत. पंतप्रधान द्वेष पसरवत आहेत. केवळ निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधानांनी खालची पातळी गाठली आहे. असा घणाघाती आरोपही ओवेसी यांनी केला आहे. (Karnatak election 2023)

तसेच, ते आम्हाला कोणती शिक्षा देऊ पाहत आहेत? असा सवालही ओवेसींनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान केवळ राष्ट्रवादावर निवडणुकीची भाषणे देतात पण आमचे सैनिक मरतात तेव्हा गप्प बसतात. पण तुम्ही फक्त भाषणे द्या.पाकिस्तानला थांबवू नका, म्हणजे ते येऊन तुमच्या सैनिकांवर हल्ले करतील. अशी उपहासात्मक टीकाही असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळी केली.

Owaisi Criticized PM Modi:
Pimpri Chinchwad BJP News: पिंपरीचे कारभारी आमदार लांडगेच राहणार की भाजप भाकरी फिरवणार ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील बेल्लारी येथे प्रचार करताना 'केरला स्टोरी' हा चित्रपट दहशतवादी कटांवर आधारित आहे असे म्हटले जाते की हा केवळ एका राज्यातील दहशतवादी कारस्थानांवर आधारित असल्याचं सांगितलं होतं. या चित्रपटात केरळसारख्या राज्यात सुरू असलेल्या दहशतवादी कारस्थानांचा पर्दाफाश करण्यात आल्याचही त्यांनी आपल्या प्रचारात सांगितलं होतं.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in