Karnataka Election Exit Poll: कर्नाटकात कोण ठरणार किंग; काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे?

Karnataka Legislative Assembly Election: कर्नाटकमध्ये कोणत्या पक्षाला मिळणार बहुमत...
Karnataka Election Exit poll
Karnataka Election Exit pollSarkarnama

Karnataka News: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठीचे मतदान आज पार पडले. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. या निवडणुकीसाठी आज 224 जागांसाठी मतदान पार पडलं. त्यानंतर आता 13 मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

मतदानानंतर आज एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे कोणत्या एक्झिट पोलनुसार कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार? याबद्दलची माहिती थोडक्यात पाहूयात...

टीव्ही 9 भारतवर्ष-पोलस्ट्रेट एक्झिट पोल काय सांगतो? : काँग्रेसला 99 ते 109 जागा मिळू शकतात. तर भाजपला 88 ते 98 जागा मिळू शकतात. तर जेडीएसला 21 ते 26 जागा मिळू शकतात. तर इतर पक्षाला 0 ते 4 जागा मिळू शकतात.

टाइम्स नाऊचा एक्झिट पोल काय सांगतो?: काँग्रेसला 106 ते 120 जागा मिळू शकतात. तर भाजपला 78 ते 92 जागा मिळू शकतात. तर जेडीएसला 20 ते 26 जागा इतर पक्षांना 2 ते 4 जागा मिळू शकतात.

Karnataka Election Exit poll
Karnataka Exit Poll : काँग्रेस सर्वात मोठा पक्ष पण, बहुमतापासून राहणार दूर? C-Voter चा सर्व्हे काय सांगतो?

झी न्यूज मॅट्रिजचा एक्झिट पोल काय सांगतो? : काँग्रेसला 103 ते 118 जागा मिळू शकतात. तर भाजप 79 ते 94 जागा मिळू शकतात. तर जेडीएसला 25 ते 33 जागा मिळू शकतात. तसेच इतर पक्ष आणि अपक्ष 2 ते 5 जागा मिळू शकतात.

रिपब्लिक टीव्ही-पी मार्क्यू एक्झिट पोल काय सांगतो? : काँग्रेसला 94 ते 108 जागा मिळू शकतात. तर भाजपला 85 ते 100 जागा मिळू शकतात. तर जेडीएसला 24 ते 32 जागा मिळू शकतात. इतरांना 2 ते 6 जागा मिळू शकतात. यानुसार कर्नाटकमध्ये त्रिशंकू परिस्थिती पाहायला मिळू शकते.

Karnataka Election Exit poll
Karnataka Exit Poll : काँग्रेस सर्वात मोठा पक्ष पण, बहुमतापासून राहणार दूर? C-Voter चा सर्व्हे काय सांगतो?

न्यूज नेशन-सीजीएस एक्झिट पोल काय सांगतो? : काँग्रेसला 86 जागा मिळू शकतात. तर भाजप 114 जागा मिळू शकतात. तर जेडीएसला 21 जागा मिळू शकतात. तीन जागा इतर पक्षाला मिळू शकतात.

टीव्ही 9 कन्नड-सी वोटरचा एक्झिट पोल काय सांगतो? : काँग्रेसला 100 ते 112 जागा मिळू शकतात. भाजपला 83 ते 95 जागा मिळू शकतात. जेडीएसला 21 ते 29 जागा मिळू शकतात. इतर पक्षाला 02 ते 06 जागा मिळू शकतात.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com