Gotabaya Rajapaksa : कुठे आहेत श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजेपक्षे?

Gotabaya Rajapaksa |Sri Lanka Crisis| श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे.
Sri Lanka Crisis news updates, President Gotabaya Rajapaksa news, Political News, Rajkiya Batmya
Sri Lanka Crisis news updates, President Gotabaya Rajapaksa news, Political News, Rajkiya Batmya

नवी दिल्ली : श्रीलंकेतील आर्थिक-राजकीय संकटाचे ढग अधिकच गडद होताना दिसत आहेत. 20 दशलक्ष लोकसंख्या असलेला श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. लाखो लोक अन्न, औषधे, इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी धडपडत आहेत. अशात श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजेपक्षे राजीनामा देऊन देश सोडून पळून गेले आहेत. (Shrilanka Latest news update)

श्रीलंकेतील आर्थिक संकटांच्या पार्श्वभूमीवर नागरिक रस्त्यावर उतरले असून निदर्शने करत आहेत. दोन दिवसांपूर्वी आक्रमक आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला आणि पंतप्रधानांचे निवासस्थान पेटवून दिले होते. अशा परिस्थितीत राष्ट्रपती गोटाबाया राजेपक्षे यांनी देश सोडल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी (१२ जुलै) त्यांनी राजीनामा दिल्यानंतर देश सोडून मालदिवला पोहचले तिथून ते दुबईला जाणार असल्याची माहिती आहे.(Sri Lanka Crisis news updates)

Sri Lanka Crisis news updates, President Gotabaya Rajapaksa news, Political News, Rajkiya Batmya
नव्या संसद भवनावरील अशोक स्तंभ वादात; हिसंक, आक्रमक सिंहाच्या रचनेवर आक्षेप

श्रीलंकेतील स्थानिक वृत्तवाहिनी एपीएफने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (President Gotabaya Rajapakse) 5 जुलैपासून बेपत्ता होते. आता त्यांनी राजपक्षे मालदीवसाठी रवाना झाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे. स्थानिक अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतप्त आंदोलकांकडून त्यांच्याविरोधात झालेल्या आंदोलनानंतर त्यांनी आज पहाटे लष्करी विमानातून देशातून उड्डाण केले. गोटाबाया राजपक्षे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने केल्यानंतर ते राजेपक्षे देश सोडून मालदीवला गेले.

आर्थिक संकटामुळे सध्या श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले आहेत. नागरिकांच्या निदर्शनांमुळे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना अटक होण्याची भीती होती. अशात ते राष्ट्रपती म्हणून देशाबाहेर जाण्याच्या प्रयत्नात होते. अटकेची शक्यता टाळण्यासाठी त्यांना पद सोडण्यापूर्वी परदेशात जायचे होते.पण राष्ट्रपती म्हणून राजेपक्षे यांनी अटकेतून सूट देण्यात आली आहे.

इमिग्रेशन अधिकार्‍यांनी एएफपीला दिलेल्या माहितीनुसार, गोटाबाया राजपक्षे बुधवारी पहाटे लष्कराच्या अँटोनोव्ह-32 विमानातून मालदीवला रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत विमानात त्यांची पत्नी आणि एक अंगरक्षक होते. दरम्यान, शनिवारी श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये हजारो नागरिकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानासमोर आंदोलने केली. राष्ट्रपती भवनातील आंदोलकांचे अनेक व्हिडीओ सुद्धा सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com