
Mumbai : मोदी-शाहांना दिल्लीच्या सत्तेतून बाहेर काढण्यासाठी विरोधी बाकांवरच्या नेत्यांची टीम 'इंडिया'निवडणुकीच्या सरावासाठी मुंबई दाखल होत आहेत. विरोधी नेत्यांच्या दोन दिवसांच्या बैठकीत जागावाटपासून निवडणूक अजेंड्यावर चर्चा होऊन दिशा ठरण्याची चिन्हे आहेत. मात्र, या बैठकीत जागावाटपाचे सूत्रच नव्हे तर थेट जागा पदरात पाडून घेण्याची चढाओढ होण्याचे संकेत आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी आपल्या सहकाऱ्यांना शहाणपणाचा 'सल्ला' दिला आहे.
बैठकीआधीच 'इंडिया'च्या नेत्यांत कुरबुऱ्या होऊ शकतात. हे जाणून "आता जागावाटपाची घाई कशाला हवी," असा सवाल करीत, अब्दुल्ला यांनी जागावाटपाची चर्चा करणाऱ्या नेत्यांचे कान टोचले आहे. परिणामी, बैठकीआधीच असा सूर आल्याने त्याचे काय पडसाद उमटणार ?
आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून केली जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला रोखण्यासाठी विरोधकांनी मोट बांधली आहे. इंडिया आघाडी बैठक उद्यापासून (गुरूवार) मुंबईत सुरू होत आहे. टीम 'इंडिया'चे ज्येष्ठ नेते अब्दुला यांनी जागा वाटपासंदर्भात विधान केले आहे.
"देशाला आणि लोकशाहीला कसे वाचू शकतो, यावर देशात बंधुत्व कसे कायम ठेवू. देशात धर्माच्या नावाने हिंदू आणि मुस्लिमांना वेगळे करण्याचे राजकारण सुरू आहे. लोकांना कसे जोडायचे, कारण भारत आपल्या सर्वांच आहे. आपला देश हा विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशात सर्वजण एक आहोत. यासाठी आम्ही लढणार आहोत. देशाला वाचवण्यासाठी विचार करणार आहोत.”
इंडियाची बैठकीपूर्वीच आम आदमी पक्षाने मोठी मागणी केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्याची मागणी केली आहे. या आपच्या मागणीमुळे इंडियाच्या बैठकीपुर्वीचं राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
Edited By : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.