Teesta Setalvad च्या FIR चा आधार काय? सुप्रिम कोर्टाने गुजरात सरकारला फटकारले

Teesta setalvad : तीस्ता सेटलवाड दोन महिन्यांपासून कोठडीत आहे, परंतु तिच्यावर कोणताही गंभीर खटला नाही.
Teesta setalvad
Teesta setalvadSarkarnama

दिल्ली : गुजरात दंगलीप्रकरणी पुराव्यांशी छेडछाड आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या तिस्ता सेटलवाड यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. मात्र त्यांच्या अर्जावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला तीस्ता सेटलवाड यांच्याविरुद्धच्या एफआयआरचा आधार विचारला आहे. न्यायालयाने सांगितले की, तीस्ता सेटलवाड यांच्यावर आयपीसीच्या सामान्य कलमांतर्गत खटला दाखल करण्यात आला असून, ती एक महिला आहे. अशा परिस्थितीत त्या महिलेला दिलासा मिळण्याचा अधिकार आहे. न्यायालयाने सांगितले की, तीस्ता सेटलवाड जवळपास दोन महिन्यांपासून कोठडीत आहे, परंतु तिच्यावर कोणताही गंभीर खटला नाही. यावर सरकारच्या वतीने वकील तुषार मेहता यांनी सांगितले की, जामीन घेण्यापूर्वी उच्च न्यायालयाचा निर्णयही सर्वोच्च न्यायालयाने पहावा.

शुक्रवारीही या प्रकरणाची सुनावणी सुरू ठेवण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. गुजरात पोलिसांनी तीस्ता सेटलवाड, माजी आयपीएस संजीव भट्ट आणि माजी डीजीपी आरबी श्रीकुमार यांच्याविरुद्ध २५ जून रोजी गुन्हा दाखल केला होता. त्याआधी, 24 जून रोजी सुप्रीम कोर्टाने झाकिया जाफरी यांचा अर्ज फेटाळला होता, ज्यामध्ये जाफरी यांनी गुजरात दंगली दरम्यान नरेंद्र मोदींना दिलेल्या क्लीन चिटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यासोबतच न्यायालयाने काही ताशेरे ओढले होते. मात्र याच्या एकाच दिवसानंतर गुजरात पोलिसांनी तीस्ता सेटलवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. झाकिया जाफरी यांना, तीस्ता सेटलवाड यांनी खटला लढण्यासाठी पाठिंबा दिला होता.

Teesta setalvad
Nana Patole : कोण कुणाला भेटतं आणि कोण कुणाचा मुडदा पाडतो, हे आपण बघतच आलो आहोत !

अटकेनंतर तीस्ता सेटलवाड यांनी अहमदाबाद न्यायालयात अर्ज केला होता, मात्र तेथून जामीन मिळाले नाही. यानंतर त्यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली, पुढील सुनावणीसाठी 19 सप्टेंबरची तारीख दिली गेली आहे. पुन्हा तीस्ता सेटलवाड यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जर न्यायालयाने तुषार मेहता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहिली, तर मात्र तिस्ता यांना जामिनासाठी आणखी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

Teesta setalvad
Prime Minister Museum: दिल्ली दर्शनासाठी जात असाल तर, पीएम संग्रहालय नक्की पहा..

या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती यू यू ललित यांच्या खंडपीठाने सांगितले की, 'या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दुसऱ्याच दिवशी तुम्ही गुन्हा नोंदवला आहे. निकालानंतर एका दिवसातच गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली गेली असती. हा खुनाचा किंवा विशेष कलमांतर्गत येणारा गुन्हा नाही, ज्यात जामीन नाकारलाच जावा, असे नाही. तिस्ता सेटलवाड ही एक महिला असून सीआरपीसीच्या कलम ४३७ नुसार महिला आरोपीला न्याय्य वागणूक मिळण्याचा हक्क आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. एफआयआरचा आधार काय आहे आणि त्यांच्याविरुद्ध आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टी सापडल्या आहेत, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असेही न्यायालयाने म्हंटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in