
India Name Dipute : मोदी सरकार भारतीय संविधानातून इंडिया हे नाव कायमस्वरूपी हटवण्यासाठी हालचाली करत आहे. अशी बातमी समोर आल्यापासून संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला धारेवर धरलं आहे. पण दुसरीकडे अभिनेत्री कंगना रानौतने मात्र इंडिया नावात आहे तरी काय, असा प्रश्न उपस्थित करत पुन्हा एकदा आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कंगनाने ट्विट करत दोन वर्षांपूर्वीचा ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यात तिने ज्यामध्ये तिने दोन वर्षांपूर्वी देशाचे नाव बदलण्याची इच्छा व्यक्त केली होती. "इंडिया हे नाव आपल्याला इंग्रजांनी दिले होते, त्यामुळे देशाचे नाव 'भारत' असावे'.हे ट्विट शेअर करत कंगनाने सर्वांना शुभेच्छा दिल्या. 'सर्वांचे अभिनंदन, आपण सर्व गुलामगिरीतून मुक्त झालो... जय भारत.' असंही तिने नव्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
तसेच, 'इंडिया' नावात प्रेम करण्यासारखे काय आहे? सर्वप्रथम त्यांना (परकीय आक्रमकांना) सिंधूचा उच्चार करता येत नव्हता, म्हणून त्यांनी ‘इंडस’ किंवा ‘हिंदोस’ असा नावाचा अपभ्रंश केला. पण महाभारत काळापासून कुरुक्षेत्राच्या महायुद्धात भाग घेणारी सर्व राज्ये 'भारत खंड' म्हणून ओळखली जात होती. मग ते आम्हाला इंदू सिंधू का म्हणत होते?" असेही कंगनाने आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
'भारत हे नाव इतकं अचूक आहे, 'भारता' चा अर्थ काय? ते आम्हाला रेड इंडियन म्हणत, कारण जुन्या इंग्रजीत इंडियन्स म्हणजे गुलाम. त्यांनी आम्हाला इंडियन असे नाव दिले कारण हीच आमची नवीन ओळख होती. जी आम्हाला ब्रिटिशांनी दिली होती. जुन्या जमान्यातील शब्दकोशातही इंडियन म्हणजे गुलाम असा अर्थ सांगितला जात होता, पण आता तो बदलला आहे. हे आमचे नाव नाही, आम्ही भारतीय आहोत, इंडियन्स नाही."
वास्तविक, G20 ची बैठक 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान दिल्लीतील प्रगती मैदानावर होणार आहे. या बैठकीच्या भोजनाला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांसाठी राष्ट्रपती भवनातून निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहे. निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रपतींऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असे लिहिण्यात आले. तेव्हापासून संपूर्ण देशात या मुद्द्यावरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठली आहे. याच वेळी कंगनाने ट्विट केले आहे.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.