
TMC MP Mimi Chakraborty Twitter : लोकप्रिय बंगाली अभिनेत्री, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय,खासदार मिमी चक्रवर्ती (mp mimi chakraborty) या पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत.
मिमी चक्रवर्ती यांनी केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी उलट-सुलट प्रतिक्रिया देण्यास सुरवात केली आहे. नेहमीच राजकीय विरोधकांवर जहरी टीका करणाऱ्या मिमी चक्रवर्ती या सध्या राजकीय नव्हे तर अन्य कारणासाठी चर्चेत आहेत.
एका विमान कंपनीच्या विरोधात त्या आक्रमक झाल्या आहेत. विमानात प्रवास करीत असताना त्यांना विमान कंपनीने दिलेल्या जेवणात केस आढळल्याने त्या संतापल्या आहेत.
मिमी चक्रवर्ती यांनी सोशल माध्यमांवर याबाबतचे फोटो शेअर करीत संबधीत कंपनीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या खास शैलीत सुनावलं आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत, अनेकांनी मिमी चक्रवर्तींच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
"तुम्ही फार मोठे झाला आहात का.." अशी सुरवात करत चक्रवर्ती यांनी सोशल मीडियावर कंपनीला टॅग करीत म्हटलं आहे की प्रिय @ अमीरात, (विमान कंपनी)मला वाटत की आपण खूप मोठे झाला आहात का..? आपल्यासोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तुम्हाला काळजी नाही. जेवणात केस आढळणे, ही अयोग्य बाब आहे. हा केस माझ्या जेवणात आढळला आहे,"
"तुम्हाला मेल केला आहे..पण तुमच्या टीमने माफी तर मागितली नाही, पण त्याचे उत्तर देणेही गरजेचे समजले नाही, तुम्हाला प्रवाशांची काळजी असेल तर माझा मेल संपूर्ण वाचा, असे मिमी चक्रवर्ती यांनी म्हटलं आहे. ही चुकीची अन् गंभीर बाब असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. "एका खासदारासोबत असा प्रकार होत आहे, तर सामान्य जनतेचं काय ?" असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.