सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करताय? ममतादीदी घेणार मोठा निर्णय

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सरकारी नोकर भरतीसाठी नवीन अट घालणार आहेत.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeSarkarnama

कोलकता : सरकारी नोकरी मिळत नसल्याचे चित्र देशभरात आहे. यातच आता पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या सरकारी नोकर भरतीसाठी मोठा निर्णय घेणार आहेत. यामुळे पश्चिम बंगालमध्ये केवळ बंगाली भाषा येणाऱ्यांना सरकारी नोकरीत स्थान मिळेल. बंगाली भाषा न येणाऱ्यांना सरकारी नोकरीपासून मुकावे लागण्याची चिन्हे आहेत.

बंगालमध्ये राज्य सरकारची प्रशासकीय कामकाजाची भाषा बंगाली आणि इंग्रजी आहे. यामुळे सरकारी नोकर भरतीसाठी बंगाली भाषा येणे आवश्यक असल्याची अट घालण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही या प्रस्तावावर गंभीर आहेत. सरकारी नोकऱ्यांमध्ये बंगाली भाषा येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

पश्चिम बंगालच्या शिक्षण विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या वादावर उच्च न्यायालयाने नुकतेच निर्देश दिले होते. शिक्षक भरताची वाद तर उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला होता. यामुळे कोणताही वाद न होता सरकारी नोकरीची भरती प्रक्रिया सुरळित व्हावी, यासाठी सरकार पावले उचलत आहे. या अंतर्गतच आता सरकारी नोकरीसाठी बंगाली भाषेची अट घातली जाणार आहे.

Mamata Banerjee
हजार कोटी रुपये द्या नायतर सरकारमधून पलटी! माजी मुख्यमंत्र्यांची धमकी

राज्यात नुकत्याच झालेल्या चार विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने (TMC) भाजपला (BJP) धूळ चारली होती. चारही जागांवर तृणमूलच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता. भाजपच्या चारपैकी तीन उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. पश्चिम बंगालमधील दिनहाटा, शांतीपूर, खरदा आणि गोसाबा या मतदारसंघात 30 ऑक्टोबरला मतदान झाले होते.

Mamata Banerjee
भाजपमधील एंट्रीनंतर अडचणीत आलेल्या मिथुनदांना न्यायालयाचा मोठा दिलासा

मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीत तृणमूलने भाजपचा पराभव करत राज्यात सत्ता मिळवली. या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदिग्राममध्ये पराभव झाला होता. नंतर पारंपरिक भवानीपूर मतदारसंघातून पोटनिवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यानंतर काही दिवसांतच चार मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या होत्या. चारही मतदारसंघात विजय मिळाल्याने तृणमूलच्या आमदारांची संख्या दोनने वाढली तर भाजपची संख्या दोनने कमी झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com