आता कोलकत्यात प्रचार करणार नाही! ममतांनी घेतला मोठा निर्णय

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असे चित्र आहे.
west bengal chier minister mamata banerjee will not campaign in kolkata
west bengal chier minister mamata banerjee will not campaign in kolkata

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असे चित्र आहे. राज्याची राजधानी असलेल्या कोलकत्यात प्रचारसभा न घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. याऐवजी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ममता या कोलकत्यात प्रतिकात्मक सभा घेणार आहेत. 

याविषयी तृणमूल काँग्रेसचे नेते व खासदार डेरेक ओब्रायन यांनी म्हटले आहे की, ममता बॅनर्जी या कोलकत्यात प्रचार करणार नाहीत. प्रचार मोहिमेच्या शेवटच्या दिवशी 26 एप्रिलला त्या केवळ एक प्रतिकत्मक सभा घेतील. तसेच, राज्यातील इतर ठिकाणच्या त्यांच्या सभांचा वेळही फक्त 30 मिनिटे करण्यात आला आहे.  

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे.  देशात काल (ता.18) 2 लाख 73 हजार कोरोना रुग्ण सापडले असून, 1 हजार 619 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमध्येही कोरोनाचा उद्रेक झाला आहे. याला आठ टप्प्यात होत असलेली विधानसभा निवडणूक कारणीभूत आहे, अशी टीका ममतांनी केली होती. बंगालमध्ये रविवारी 8 हजार  419 कोरोना रुग्ण सापडले. 

विधानसभा निवडणुकीमुळे प्रचारसभा आणि रॅली यांचे आयोजन केले जात आहे. यासाठी प्रचंड गर्दी होत असून, सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना विषयक इतर उपाययोजनांचे पालन होत नाही. याचाच परिणाम होऊन राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. बंगालमध्ये अद्याप निवडणुकीचे तीन टप्पे बाकी आहेत. उरलेले टप्पे एकाच दिवशी घ्यावेत, अशी मागणीही तृणमूलने केली होती. परंतु, निवडणूक आयोगाने यात बदल करण्यास नकार दिला आहे. 

अखेर ममतांनीच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून प्रचार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकत्यात तर त्यांनी प्रचारच न करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्या कोलकत्यात प्रतिकात्मक सभा घेतील. तसेच, राज्यातील इतर ठिकाणच्या सभा ही 30 मिनिटांच्या वेळात आटोपण्यात येणार आहेत. 

निवडणूक आयोगाने एकाच टप्प्यात निवडणूक घेण्यास नकार दिला असला तरी प्रचाराची वेळ कमी केली आहे. मतदानाच्या 72 तास आधी प्रचार बंद करण्यात येत आहे. तसेच, सायंकाळी 7 ते सकाळी 10 पर्यंत प्रचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com