Mamata Banerjee : पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात ममता बॅनर्जींचं नाराजी नाट्य; नेमकं काय घडलं?

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी व्यासपीठावर न बसता थेट व्यासपीठाच्या समोर खुर्चीवर बसल्या...
Narendra Modi and Mamata Banerjee
Narendra Modi and Mamata BanerjeeSarkarnama

Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालच्या हावडा स्टेशनवर 'वंदे भारत एक्स्प्रेस'ला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी पंतप्रधान मोदी हे या कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थित होते.

तर याच कार्यक्रमाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील उपस्थित होत्या. मात्र यावेळी ममता बॅनर्जी यांचं नाराजी नाट्य पाहायला मिळालं. त्यामुळे ममता बॅनर्जी नेमकं कोणत्या कारणामुळे नाराज झाल्या? याची चर्चा रंगली आहे.

नेमकं काय घडलं?

पश्चिम बंगालच्या हावडा स्टेशनवर 'वंदे भारत एक्स्प्रेस'ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील आल्या. मात्र यावेळी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या. त्यामुळे ममता बॅनर्जी या नाराज होत व्यासपीठावर न बसता थेट व्यासपीठाच्या समोर अधिकाऱ्यांसाठी ठेवण्यात आलेल्या खुर्चीवर त्या बसल्या. त्यामुळे काही वेळ कार्यक्रमाचे आयोजक देखील गडबडले होते.

Narendra Modi and Mamata Banerjee
Assembly Session News: आम्ही रेशीम बागेत गेलो; गोविंद बागेत नाही गेलो : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

मात्र, नंतर त्यांना मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यपाल सी.वी.आनंद बोस यांनी त्यांना व्यासपीठावर बसण्याची विनंती केली. पण त्यांनी व्यासपीठावर बसण्यास नकार दिला. त्यामुळे या कार्यक्रमादरम्यान काही वेळ नाराजी नाट्य बघायला मिळालं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी यावेळी विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. पण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या नाराजी नाट्यामुळे या कार्यक्रमाची जोरदार चर्चा रंगली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com