'यूपी'त मोठं नाट्य : योगींचे कार्यकर्ते निषेधासाठी येताच ममता थेट रस्त्यात जाऊन भिडल्या!

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उतरल्या आहेत.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeSarkarnama

वाराणसी : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) प्रचारात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही (Mamata Banerjee) उतरल्या आहेत. समाजवादी पक्षाचा प्रचारासाठी त्या आल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी ममतांचा ताफा जात असताना आंदोलन केले. त्यावेळी ममता थेट मोटारीतून खाली उतरून रस्त्यात जाऊन उभ्या राहिल्या. यावर भाजपचा (BJP) पराभव आता अटळ असल्याचे भाकित ममतांनी वर्तवले आहे.

ममता बॅनर्जी या दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीला जात होत्या. त्यावेळी हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत ममतांच्या ताफ्यासमोर आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी ताफ्यासमोर घोषणाबाजी करीत वाहने अडवून धरली. यानंतर अखेर ममता थेट गाडीतून खाली उतरून रस्त्यावर उभ्या राहिल्या. यानंतर कार्यकर्ते निघून गेले. दश्वाश्वमेध घाटावर पोचल्यानंतर या घटनेचा निषेध म्हणून ममता बॅनर्जी या खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर खालीच बसल्या.

Mamata Banerjee
महापालिका निवडणुकीआधी शिवसेनेच्या यशवंत जाधवांसह तीन नेत्यांचा पाय खोलात

प्रचारसभेत आज याबद्दल बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, की मी काल विमानतळावरून दशाश्वमेध घाटावर जात असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मध्येच माझी मोटार अडविली. माझ्या मोटारीवर त्यांनी हल्ला करुन परत जा, असे मला बजावले. भाजप कार्यकर्त्यांच्या मेंदूत हिंसाचाराशिवाय दुसरे काहीही नसते. ते उत्तर प्रदेशातील सत्ता गमवत असून, भाजपचा पराभव जवळ आला आहे.

Mamata Banerjee
शशिकलांचं कमबॅक! अण्णाद्रमुकच्या पनीरसेल्वम यांनीच मांडला ठराव

भाजप कार्यकर्ते शिवीगाळ करीत असताना मी मोटारीतून उतरले आणि हल्लेखोर काय करू शकतात, हे पाहण्यासाठी रस्त्यावर उभे राहिले. भाजप कार्यकर्ते काय करू शकतात, हे पाहण्याची माझी इच्छा होती. प्रत्यक्षात ते घाबरट आहेत. हा हल्ल्या केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानले. या हल्ल्यातून उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव होत आहे, हाच संदेश गेला. असे नसते तर त्यांनी माझ्यावर हल्ला का केला असता? मी घाबरट नसून धाडसी आहे आणि मी खूप काळापासून संघर्ष केला आहे. अनेकवेळा माझ्यावर हल्ले करण्यात आले. एवढे हल्ले होऊनही मी कधीही झुकले नाही, असे बॅनर्जी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in