भाजपचे प्रदेशाध्यक्ष ट्विट करुन थेट हिमालयात गेले निघून!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हे ट्विट करुन थेट हिमालयात रवाना झाले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
west bengal bjp state president dilip ghosh leaves for himalaya
west bengal bjp state president dilip ghosh leaves for himalaya

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सत्ता मिळवण्याची हॅटट्रिक केली आहे. भाजपने (BJP) ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. अखेर बंगालमध्ये भाजपचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंगले. आता भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष (Dilip Ghosh) हे ट्विट करुन थेट हिमालयात रवाना झाले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

पश्चिम बंगालमध्ये एकूण 292 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 213 मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला. या वेळी 77 जागांसह भाजप प्रमुख विरोधी पक्ष बनला. राज्यात बहुमताचा आकडा पार करुन मोठ्या बहुमतासह पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनी सत्ता स्थापन केली. बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्ववाद विरुद्ध ममतांची बंगाली अस्मिता अशी लढाई होती. अखेर ममतांची बंगाली अस्मिता भाजपवर भारी पडली.  

आता निवडणुकीला दोन महिने उलटल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या ट्विटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी दुर्गापूर एक्स्प्रेस वेवरुन ट्विट केले आहे. यात ते मावळत्या सूर्यासमोर सेल्फी घेत आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कधीतरी सूर्यास्ताचा अनुभवही घ्यायला हवा. सूर्य मावळतो त्यानंतरच आपण नवी पहाट पाहू शकतो. 

घोष हे 2015 पासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पश्चिम बंगालमधील पराभवानंतर त्यांना बदलले जाईल, अशी चर्चा होती. त्यामुळे ते भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याचे अंदाज बांधले जात होते. आता त्यांच्या ट्विटने या चर्चांना खतपाणी मिळाले आहे. घोष हे 14 जुलैला लडाखला गेले आहेत. संसदेचे अधिवेशन 13 ऑगस्टला संपल्यानंतर ते राज्यात परततील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

घोष हे मिदनापूरचे खासदार आहेत. बोगस कोरोना लसीकरण शिबिरांविरोधात बंगालमधील भाजप रस्त्यावर उतरली असताना ते लडाखला गेले आहेत. घोष यांनी नुकतीच दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी ट्विटरवर म्हटले होते की, मी हिमालयात जात आहे. तेथे काही दिवस राहून मी 19 जुलैपासून संसदेच्या अधिवेशनाला उपस्थित राहीन. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com