विरोधी पक्षनेते अडचणीत! आमदारांना इनकम टॅक्सच्या छाप्यांची धमकी दिल्यानं हक्कभंग

विधानसभेतील भाषणादरम्यान अडथळा आणणाऱ्या आमदारांना प्राप्तिकर विभागाच्या कारवाईची धमकी देणे विरोधी पक्षनेत्यांना महागात पडले आहे.
Suvendu Adhikari
Suvendu AdhikariSarkarnama

कोलकता : विधानसभेतील भाषणादरम्यान अडथळा आणणाऱ्या भाजपच्या चार बंडखोर आमदारांना प्राप्तिकर विभागाच्या कारवाईची धमकी देणे विरोधी पक्षनेत्यांना महागात पडले आहे. विरोधी पक्षनेत्यांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला आहे. हा प्रकार पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) घडला आहे. यामुळे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) विरुद्ध भाजप (BJP) अशी लढाई सुरू झाली आहे.

भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांच्या विरोधातील हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत स्वीकारण्यात आला आहे. हा प्रस्ताव आता हक्कभंग समितीकडे पाठवण्यात आला आहे, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष विमान बॅनर्जी यांनी विधानसभेत केली. यानंतर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी विधानसभेत बाके वाजवून या घोषणेचे स्वागत केले. तर भाजपच्या सदस्यांना निषेध करीत सभात्याग केला. भाजपचे बंडखोर आमदार कृष्णा कल्याणी, तन्मय घोष, सौमेन रॉय, विश्वजित दास यांनी मागील वर्षी भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर त्यांनी पक्षांतरबंदी कायद्यानुसार आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही.

Suvendu Adhikari
मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब होताच सावंतांना पहिली आठवण पर्रीकरांची!

अधिकारी हे विधानसभेत बोलत असताना या चार आमदारांनी त्यांच्या भाषणात अडथळे आणले. अधिकारी हे सातत्याने राज्य सरकारविरोधात खोटानाटा प्रचार करीत आहेत, असा आरोप या आमदारांनी केला. यामुळे संतापलेल्या अधिकारींना या आमदारांना प्राप्तिकर विभागाचे छापे टाकण्याची धमकी दिली. या आमदारांना याची तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे केली. अध्यक्षांनी या तक्रारीची दखल घेऊन सभागृहाच्या नियमानुसार या चार आमदारांना संरक्षण देण्याचे जाहीर केले. अधिकाऱ्यांनी मात्र, त्यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

Suvendu Adhikari
अशीही खेळी! आता विधानसभेत आमदारांचं होणार आपोआप निलंबन

दरम्यान, नुकत्याच झालेल्या महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांत (Civic Polls) तृणमूलच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी विरोधकांना धूळ चारली होती. याचवेळी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावत ममतांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढले होते. सुवेंदू अधिकारी यांनी विधानसभा निवडणुकीत नंदिग्राम मतदारसंघात ममतांचा पराभव केला होता. नंदिग्राम हा अधिकारी कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. नंतर ममता या भवानीपूरमधून विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. आता ममतांनी या पराभवाची परतफेड केली. अधिकारी कुटुंबीयांचे तब्बल 40 वर्षापासून वर्चस्व असलेली कंठी महापालिका तृणमूलने हिरावून घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com