“मोदी हे केवळ बहाणा..,मला त्यांनी घर सोडण्यास भाग पाडलं ; आझादांनी सांगितलं राजीनाम्याचं कारण..

Ghulam Nabi Azad : राहुल गांधी यांना यशस्वी नेता बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, पण त्यांनी फार रुची घेतली नाही.
Ghulam Nabi Azad latest news
Ghulam Nabi Azad latest newssarkarnama

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. काँग्रेसला सोडचिट्ठी दिल्यानंतर गुलाम नबी आझाद नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.आझाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यापासून पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा प्रश्नही अद्याप सुटलेला नाही. अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. यावरुन सध्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात येत आहे. गुलाम नबी आझाद यांनी आज माध्यमांशी बोलताना काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत. घर सोडण्यास भाग पाडल्याचा आरोप देखील आझाद यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना केला आहे.

आझाद म्हणाले, “तीस वर्षांपूर्वी सोनिया गांधींबद्दल जो आदर होता, तो आजही आहे. इंदिरा गांधीबद्दल जो आदर आहे तसाच आदर राहुल गांधींबद्दलही आहे. त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी मी प्रार्थन करेन. राहुल गांधी यांना यशस्वी नेता बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, पण त्यांनी फार रुची घेतली नाही.” काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षात अनेक बैठका होत होत्या. मात्र, या बैठकांमध्ये माझा एकही सल्ला घेण्यात येत नव्हता अशी नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

Ghulam Nabi Azad latest news
Shiv sena : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार ; उद्धव ठाकरेंनी विरोधकांना ठणकावले

“मोदी हे केवळ बहाणा आहे. जी-२३ सदस्यांनी काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिल्यापासून त्यांना माझ्यासोबत समस्या आहेत. कोणीही त्यांच्या विरोधात लिहावं किंवा प्रश्न विचारावेत, असं त्यांना नको असतं” अशा शब्दात आझाद यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राजीनामा देण्याआधी सहा दिवस झोपलो नाही..

"राहुल गांधी यांनी यशस्वी नेता व्हावं यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. पण, त्यांना त्यात रुची नाही. ते एका जागी थांबतच नाहीत, काँग्रेसच्या अनेक बैठका झाल्या पण त्यातून एकही निर्णय आला नाही. राजीनामा देण्याआधी सहा दिवस झोपलो नाही. या पक्षासाठी आम्ही रक्त सांडवलं आहे. काँग्रेस पक्षात सध्या अकार्यक्षम लोक आहेत. काँग्रेसमधील प्रवक्त्यांना आमच्या विषयी माहित नसणं, अत्यंत वेदनादायी आहे” अशी प्रतिक्रिया आझाद यांनी दिली आहे.

पक्षासाठी त्यांच्याकडेही वेळ नाही..

"गेल्या ५० वर्षांत अध्यक्ष पदासाठी निवडणुका लागल्या नाहीत. पण यंदा लागणार आहेत. १३७ वर्षांत जे झालं नाही ते आता होतंय. गांधी कुटुंब परदेशात जाणार आहे म्हणून ते निवडणुका घेत आहेत. पण परदेशात जाण्याआधी किंवा परदेशातून जाऊन आल्यानंतर ते अध्यक्ष निवडू शकले असते. पण तसे झाले नाही. मी वेळ देत नाही असा माझ्यावर आरोप झाला. पण पक्षासाठी त्यांच्याकडेही वेळ नाही," असा आरोप गुलाम नबी आझाद यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in