Amritpal Singh Arrested: अमृतपालला पळून जाण्यासाठी कुणी मदत केली ? ; सरकारला काँग्रेसचे सहा प्रश्न...

Congress on Amritpal Singh Arrested : अमृतपालच्या साथीदारांवर पंजाब सरकार कारवाई का करीत नाही?
Amritpal Singh
Amritpal SinghSarkarnama

Waris Punjab De Chief Amritpal Singh Arrested: पंजाब पोलिसांनी आज (रविवारी) खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग याला मोगा येथून अटक केली आहे. अमृतपालला रोडे गावातील गुरुद्वारातून अटक करण्यात आली.

भटिंडा विमानतळावरून अमृतपालला विमानाने आसाममधील दिब्रुगड तुरुंगात नेण्यात आले आहे. अमृतपालवर NSA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमृलपालच्या अटकेवरुन आता राजकारण सुरु झाले आहे. काँग्रेसचे अमृतपालच्या अटकेवरुन केंद्र सरकार, पंजाब सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. काँग्रेस नेता रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र आणि पंजाब सरकारला याबाबत जाब विचारला आहे. सुरजेवाला यांनी सहा प्रश्न उपस्थित केले आहेत.

अमृतपाल याला डिब्रूगढ कारागृहात ठेवण्यात आले आहे. या कारागृहात त्याचे अन्य साथीदार शिक्षा भोगत आहेत. डिब्रूगढ कारागृहाच्या बाहेर मोठया प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

Amritpal Singh
Amritpal Singh News : अमृतपालचं असं होत 'लेडी नेटवर्क' ; महिलांच्या मदतीनं देत होता IB अन् पोलिसांना गुंगारा...

अटक करण्यापूर्वी अमृतपाल गुरुद्वारामध्ये प्रवचन देत होता.त्याला आपल्या समर्थकांच्या जमावाने येथे सरेंडर करायचे होते. अमृतपालला भटिंडा विमानतळावरून विमानाने आसाममधील दिब्रुगड तुरुंगात नेण्यात आले आहे. अमृतपालवर NSA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमृतपाल ३६ दिवसापासून पोलीस, तपास यंत्रणांना गुंगारा देत होता. गोपनीय माहिती मिळाल्यानंतरही तो पोलिसांच्या हातातवर तुरी देऊन निसटून जात असे. या सर्व प्रकारात त्याला मदत करणारी कोणती यंत्रणा होती, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांच्या अटकेनंतर आता अनेक मोठे खुलासे पोलीस तपासात बाहेर येत आहे.

अमृतपालला इच्छित स्थळी पोहचविण्यासाठी 'लेडी नेटवर्क' मदत करीत होते, अशी माहिती समोर येत आहे. 'लेडी नेटवर्क'च्या माध्यमातून अमृतपाल सहजपणे पोलिसांना ३६ दिवस गुंगारा देत राहिला.

Amritpal Singh
Ankita Dutta News : प्रियंका गांधींचा 'लड़की हूं, लड़ सकती हूं' चा नारा खोटा ठरला ; छळवणूक प्रकरणी महिला पदाधिकाऱ्याची हकालपट्टी..

काँग्रेसचे केंद्र सरकार व पंजाब सरकारला सहा प्रश्न

  1. देशाच्या विरोधात प्रचार करणारा, खलिस्तानी समर्थक अमृतपाल याला पहिल्यांदा पळून जाण्यास कुणी मदक केली?

  2. अमृलपाल इतके दिवस कुठे लपला होता. त्याला कुणी आश्रय दिला होता, ते सारे देशाचे विरोधक नाही का?

  3. अमृलपाल यांचे साथीदार कोण ? एनआयए, सीबीआय, आयबी, पंजाब पोलीस यांचा खुलासा का करीत नाही?

  4. पाकिस्तान आणि अन्य कुठली शक्ती त्याला सहकार्य करीत होती, याबाबत सरकारने उत्तर देण्यासाठी पुढे का येत नाही?

  5. अमृतपालच्या साथीदारांवर पंजाब सरकार कारवाई का करीत नाही?

  6. अमृलपाल याचे केंद्र सरकार आणि पंजाब सरकारमधील कुणाशी सबंध आहेत का?

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com