
Delhi Politics : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यात मोफत सुविधा देण्याच्या मुद्द्यावरून शाब्दिक युद्ध रंगले आहे. दोघांनीही एकमेकांवर आगपाखड केली आहे. राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या मोफत सुविधा या दोघांतील वादात कळीचा मुद्दा ठरला. दिल्लीच्या मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पोस्टला उत्तर देताना खट्टर यांनी मोफत सुविधांच्या मुद्द्यावरून सडकून टीका केली.
खट्टर यांनी त्यांच्या पोस्टमधून केजरीवाल व त्यांच्या मंत्र्यांवर निशाणा साधला. अशा स्वरूपांच्या मोफत सुविधांमुळे त्यांना येत्या काळात संभाव्य परिणामांना सामोरे जावे लागू शकते. याचवेळी त्यांनी कायदेशीर बाबींकडे लक्ष वेधले. खट्टर यांच्या टीकेलाही केजरीवाल यांनी त्वरीत उत्तर देत त्यांचा पक्षांकडून करदात्यांच्या पैशाचा वापर जनतेला मोफत सुविधा देण्यासाठी करत असल्याचे सांगत आपल्याला चिंता करण्याचे कारण नसल्याची पोस्ट केजरीवाल यांनी केली.
'आम्ही करदात्यांच्या पैशाचा वापर करून जनतेला मोफत सेवा देतो. पण तुमच्या पक्षात तुमच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या फायद्यासाठी सार्वजनिक निधीचा गैरवापर करण्याची प्रवृत्ती दिसते. पण तुम्ही तुमच्या मंत्र्याची चुकीची कामे लपवण्याचा खूप प्रयत्न करत आहात. महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांच्या मागे संपूर्ण भाजपच उभी राहण्याचे कारण काय? असे ट्विट करत केजरीवाल यांनी खट्टर यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. याआधीही रविवारी दिवसभर ट्विटरवरून या दोघांमध्ये शाब्दिक चकमकी झडतच होत्या.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.