
WAPCOS EX CMD Rajender Kumar Gupta: बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयने मंगळवारी (2 मे) मोठी कारवाई केली. जलशक्ती मंत्रालयांतर्गत पाणी आणि ऊर्जा सल्लागार कंपनी (WAPCOS)चे माजी व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) राजेंद्रकुमार गुप्ता यांच्या घरावर छापे टाकून सीबीआयने रोख २० कोटी रुपये जप्त केले आहेत.
जलशक्ती मंत्रालयाच्या (Ministry of Water Power) माजी सीएमडीच्या घरावर सीबीआयनं छापा टाकला. दिल्ली (Delhi) आणि चंदीगडसह (Chandigarh) देशभरातील त्यांच्या मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली. छापेमारीत 20 कोटी रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे. या छाप्यात एकूण 20 कोटी रुपये रोकड आणि काही कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. आरोपी राजेंद्र कुमार गुप्ता हे वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सी (WAPCOS) मध्ये 'सीएमडी' म्हणून काम करत होते. हा विभाग जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार , राजेंद्रकुमार गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध बेहिशेबी मालमत्तेसाठी गुन्हा नोंदवला. त्यानंतर सीबीआयने दिल्ली, चंदीगड, पंचकुला, गुरुग्राम, सोनीपत आणि गाझियाबादसह सुमारे 19 ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान, 20 कोटी रुपयांच्या रोख रक्कम, मालमत्तेंशी संबंधित कागदपत्रे आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत.
रक्कम बघून अधिकाऱ्यांचे डोळे झाले पांढरे
या छाप्या दरम्यान अधिकाऱ्यांना सुटकेस आणि बेडमध्ये रोख रक्कम मिळाली. सीबीआयने छापेमारीत तपास केला असता त्यांना ही रोकड सापडली. अधिकाऱ्यांनी माहिती दिली की पुढील तपास सुरू असून हा पैसा कुठून आला याची चौकशी सुरू आहे. चौकशी झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण स्पष्ट होईल की एवढं रक्कम आली कुठून?
राजेंद्रकुमार गुप्ता हे WAPCOS (वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सी) लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ( सीएमडी ) आहेत. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत ही कंपनी काम करते. WAPCOS हे 'वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड' म्हणून ओळखले जाते. ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे, जी पूर्णपणे केंद्र सरकारच्या मालकीची आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालय त्याच्या कार्यावर देखरेखी खाली कामकाज चालते.
WAPCOS हे जलशक्ती मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली चालणारा उपक्रम आहे. हा प्रकल्प केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.या उपक्रमाला या पूर्वी 'वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (इंडिया) म्हणून ओळखले जाते.
Edited- Rashmi mane
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.