Presidential Election 2022 : मुर्मू -सिन्हा यांच्यात लढत, आज मतदान

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदार आणि आमदारांसह एकूण 10 लाख 81 हजार 991 मते आहेत.
 yashwant sinha, draupadi murmu
 presidential election
yashwant sinha, draupadi murmu presidential election sarkarnama

नवी दिल्ली : देशाच्या नव्या राष्ट्रपतींसाठी आज मतदान (Presidential Election)होत आहे. त्यासाठी ४,८०० निर्वाचित खासदार-आमदार मतदान करतील. १५ व्या राष्ट्रपतींसाठी एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू (draupadi murmu)आणि विरोधकांतर्फे यशवंत सिन्हा उमेदवार आहेत. (voting today for 15th presidential election news update)

राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी (Presidential Election) आज संसद भवन आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकीत लोकसभेचे 543 खासदार मतदान करतील तर राज्यसभेचे 233 खासदार मतदान करतील.

देशभरातील 4 हजार 33 आमदारही मतदान करणार आहेत, म्हणजेच खासदार आणि आमदार संमिश्र असल्यास एकूण 4 हजार 809 सदस्य राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मतदान करतील.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदार आणि आमदारांसह एकूण 10 लाख 81 हजार 991 मते आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयाचा बहुमताचा आकडा 5 लाख 40 हजार 996 आहे. मुर्मूंचा विजय निश्चित मानला जात आहे.

 yashwant sinha, draupadi murmu
 presidential election
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत मुख्यमंत्र्याचा दुजाभाव ; निधीबाबत राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

प्रतिभा पाटील यांच्यानंतर मुर्मू सर्वोच्च घटनात्मक पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या आदिवासी, दुसऱ्या महिला असतील. एका खासदाराचे मत मूल्य ७०० आहे. आमदाराचे सर्वात कमी ७ (सिक्कीम) पासून सर्वाधिक २०८ (यूपी) पर्यंत आहे.

द्रौपदी मुर्मू (वय ६४) :

ओडिशाच्या आहेत, झारखंडच्या पहिल्या आदिवासी राज्यपाल.

राष्ट्रपतिपदासाठी माझ्या उमेदवारीमुळे १० कोटी आदिवासी खुश आहेत, दिल्लीत मुर्मू यांचे वक्तव्य

यशवंत सिन्हा (वय ८४)

नोकरशहा होते. जनता पक्ष, नंतर भाजपत आले. केंद्रात मंत्री होते.

ही निवडणूक दोन उमेदवारांची नाही, दोन विचारसरणींची आणि आदर्शांची आहे, असे सिन्हा यांनी म्हटले आहे.

  • संसद भवनातील 63 क्रमांकाच्या खोलीत मतदानाला सुरुवात होणार आहे

  • राज्यांच्या विधानसभांमध्ये आमदारांना मतदान करता येणार आहे.

  • 21 जुलै रोजी मतमोजणी होणार असून 25 जुलै रोजी राष्ट्रपतींचा शपथविधी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com