मोठी बातमी; व्होडाफोन-आयडियाला ताब्यात घेण्यासाठी मोदी सरकार सरसावलं

केंद्र सरकारचा सर्वात मोठा हिस्सा या कंपनीत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Vodafone Idea
Vodafone IdeaSarkarnama

नवी दिल्ली : भारतातील तिसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी (Telecom Company) असलेल्या व्होडाफोन-आयडियाला (Vodafone-Idea) वाचवण्यासाठी मोदी सरकारने (Modi Government) पुढाकार घेतला आहे. या कंपनीमध्ये आता केंद्र सरकारचा सर्वाधिक 35.8 टक्के हिस्सा असेल. त्यामुळे ही कंपनी सरकारच्याच ताब्यात येऊल, असे स्थिती निर्माण झाली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने कर्जाचे रुपांतर समभागात करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे कंपनीला मोठा दिलासा मिळणार असल्याची सांगितले जात आहे.

केंद्र सरकारच्या थेट भागिदारीमुळे कंपनीत आता व्होडाफोन (Vodafone) ग्रुपचा 28.5 टक्के तर आदित्य बिर्ला ग्रुपचा 17.8 टक्के हिस्सा राहिले. त्यामुळे केंद्र सरकारचा सर्वात मोठा हिस्सा या कंपनीत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या तडजोडीला कंपनीला वाचवण्याची योजना मानले जात आहे. कारण मागील काही वर्षांपासून टेलिकॉम क्षेत्रात ही कंपनी तग धरून राहण्यासाठी झगडत आहे. व्होडाफोन ग्रुपने 2018 मध्ये कुमार मंगलम बिर्ला यांच्या कॉन्गलोमरेट कंपनीत विलनीकरण केले होते.

Vodafone Idea
पक्ष बदलला म्हणून निवडणूक हरले; भाजपमध्ये गेलेल्या माजी मंत्र्यांची कबुली

त्यानंतर व्होडाफोन व आयडिया (Idea) एकत्रित आले. मागील वर्षी कंपनीने 'Vi' असे ब्रँडिंग केले आहे. पण सध्याच्या स्पर्धेत कंपनीला अजूनही छाप पाडता आलेली नाही. रिलायन्स जिओचा या क्षेत्रात शिरकाव झाल्यानंतर आणि एअरटेल कंपनीकडूनही स्पर्धा वाढल्याने आयडिलाचे लाखो ग्राहक कमी होत गेले. रिलायन्स जिओने (Reliance Jio) बाजारात कमी दरात इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिल्याने इतर कंपन्यांना मोठा झटका बसला. त्यामुळे आयडियासह एअरटेल व इतर कंपन्यांचे ग्राहक जिओकडे गेले.

Vodafone Idea
कोरोना नियंत्रणाबाहेर; राजधानीत खासगी कार्यालये, रेस्टॉरन्ट, बार आजपासून कुलूपबंद

व्होडाफोन कंपनीला सरकारला 58 हजार कोटी देणे बाकी आहे. त्यामुळे कंपनीची स्थिती सध्या दयनीय असल्याचे सांगितले जात आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कंपनीने थेट सरकारला हिस्सा देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानुसार सरकारचा देणं असलेल्या रकमेच्या तुलनेत 36 टक्के हिस्सा कंपनीत राहणार आहे. टेलिकॉम क्षेत्रातील ही मोठी घडामोड मानली जात आहे.

सध्या देशात प्रामुख्याने जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन या कंपन्या आहेत. व्होडाफोनला सरकारने जीवनदान दिल्याने कंपन्यांमधील स्पर्धा वाढून त्याचा थेट ग्राहकांना फायदा होऊ शकतो. अन्यथा या क्षेत्रात दोन कंपन्यांचेच वर्चस्व राहिल्यास त्याचा फटका ग्राहकांना बसण्याची भीती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in