जुन्या मित्रामुळं भाजपला पोटनिवडणुकीत बसला झटका!

निवडणुकीत व्हीआयपीच्या उमेदवार गीता देवी यांना जवळपास 30 हजार मतं मिळाली आहेत. त्यांच्यामुळे भाजपचा पराभव झाल्याची चर्चा आहे.
Mukesh Sahani
Mukesh SahaniSarkarnama

पाटणा : बिहारमधील बोचहां विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला (BJP) धक्का बसला आहे. राष्ट्रीय जनता दलाने (RJD) विजय खेचून आणत भाजपच्या उमेदवाराचा तब्बल 36 हजार मतांनी पराभव केला आहे. बिहारमध्ये (Bihar) सत्ता असूनही हा पराभव झाल्याने भाजपवर नामुष्की ओढवली आहे. त्यानंतर भाजपचा जुना मित्र असलेल्या विकासशील इन्सान पक्षाने जखमेवर मीठ चोळले आहे.

निवडणुकीत आरजेडीचे अमरकुमार पासवान हे विजय झाले असून, त्यांना 82 हजार 562 मते मिळाली. याचवेळी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने माजी मंत्री रमाई राम यांच्या कन्या बेबी कुमारी यांना तिकीट दिले होते. त्यांना 45 हजार 909 मते मिळाली. सत्ताधारी भाजप आणि संयुक्त जनला दलाला आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी हा मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. विकासशील इन्सान पार्टीचे (VIP) आमदार मुसाफिर पासवान यांच्या मृत्यूमुळे बोचहां मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती.

Mukesh Sahani
पोटनिवडणुकीचा निकाल लागताच सतेज पाटील 'ड्रीम प्रोजेक्ट'साठी धावले!

निवडणुकीच्या निकालानंतर व्हीआयपीचे प्रमुख मुकेश सहानी यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले, आमच्या पक्षावर लोकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानतो. पण आम्हाला विजय मिळाला नसला तरी आमच्या पराभवातच आमचा विजय आहे. भाजपचा 36 हजार मतांनी पराभव झाला आहे. भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. त्यांनी केंद्रीय नेत्यांना फसविणे थांबवावे. भाजपला आता 2024 च्या लोकसभा आणि 2025 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही झटका बसणार आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा द्यालला हवा.

निवडणुकीत व्हीआयपीच्या उमेदवार गीता देवी यांना जवळपास 30 हजार मतं मिळाली आहेत. त्यांच्यामुळे भाजपचा पराभव झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आमच्या पराभवातच आमचा विजय असल्याचे वक्तव्य करत सहानी यांनी भाजपला सूचक इशारा दिला आहे. मागील निवडणुकीत सहानी हे एनडीएमध्ये सहभागी होते. त्यावेळी या मतदारसंघात त्यांचा उमेदवार निवडून आला होता. पण पोटनिवडणुकीवेळी ते एनडीएतून बाहेर पडले. त्यांनी भाजप व आरजेडीला एकाकी लढत दिली. त्याचा सर्वाधिक फटका भाजपला बसल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com